![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
विकासाचा ध्यास घेऊन जनतेच्या सेवेसाठी उन्ह, वारा, पाऊस अशी कशाचीही तमा न बाळगता सतत कार्यमग्न रहात असलेल्या खासदार सुनील मेंढे यांनी आज भर पावसात भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. भंडारा जिल्हासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने परिपत्रक काढून पाहिले पाऊल टाकले.
पलाडी येथील मान्यता मिळालेल्या 22 हेक्टर जागेची आज खासदार सुनील मेंढे यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार, तलाठी व अन्य अधिकारी सोबत होते. धो धो पाऊस पडत असतानाही त्यांनी विस्तृत माहिती जाणून घेत लोकाभिमुखतेचा परिचय दिला.