![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधी/ जीवन वनवे
दलालांच्या भूलपाथ्याला बळी न पड़ता, दलालांपासून सावध राहण्याचे आव्हाहन :- योगिता परसमोडे
तुमसर:एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तुमसर अंतर्गत 50 मदतनिस मानधनी पदांकरीता म.रा.शासन निर्णय क्र. एबावि 2022 /प्र. क्र. 94/का-6 नविन प्रशासन भवन मंत्रालय मुंबई 32
दि. 02 फेब्रुवारी 2023 अन्वये भरती प्रक्रिया . 17 जुलै 2023 रोजी.जाहिर करण्यात आली आहे.
अर्ज स्वीकारण्याचा दि. 17 जुलै 2023 ते दी. 27 जुलै 2023 या कालावाधित कार्यालयीन वेळेत ( सुट्टीचे दिवस वगळून ) ए.बा.बी. सेवा योजना प्रकल्प तुमसर येथे आस्थापना विभागत अर्ज स्वीकारण्यात येतील. सदर पदांकरीता पात्रता व सर्व नियम अटिंसाठीचा जाहिरनामा तसेच भरती अर्जाचा नमूना संबंधित महसूली गावाच्या ग्रामपंचायत ला उपलब्ध करण्यात आला आहे. सदर पदांकरीता शासन निर्णायातील परिशिष्ठ अ प्रमाणे शैक्षणिक अहरता सामाजिक आरक्षण, अंगणवाडी सेविक/मदतनीस पदाचा अनुभव , विधवा / अनाथ या निकाषांआधारे त्रयस्थ पडताळणी समितिद्वारे वस्तुनिष्ठ गुणदान होणार असून कोणत्याही प्रकरारची लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षा / मुलाखत घेतली जाणार नाही. सर्व शैक्षणिक पात्रतेसाठी लागणारे दस्ताऐवज / कागदपत्रे, गुणपत्रक स्थानिक रहिवासी दाखला , मराठी भाषेचे ज्ञान , लहान कुटुंब अट लागु राहील. तसेच विधवा / अनाथ , अ.जाती /अ जमाती/ इ.मा.प्र./ विमा प्रवर्गास तसेच अगणवाडी सेविका / मदतनीस पदावर कमीत कमी 2 वर्षाचा शासकीय अनुभव असल्यास शा. निर्णयानुसार गुणदान करण्यात येईल. प्राप्त अर्जावर हरकती/ आक्षेप करीता 10 दिवसांची मुदत असल्याने सदर भरती प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाने पूर्णता पारदर्शक होणार आहे. तरीअर्जदाराने याची देखल घ्यावी.
प्रकल्पाअंतर्गत खालील अंगणवाडी केंद्रामधे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आष्टी क्र. 1, 3 पाथरी 1 , चिखला 3,5,6 देव्हाड़ी 1, चारगांव 1 , ढोरवाड़ा , शिवणी 1 , परसवाडा (दे) येरली 3, खापा 2 , पिपरा, पचारा उमरवाडा 1, 2 , हसारा 1, 2 , कर्कापुर 1, 2, वाहनी , पिपरीचुन्नी , बोरगावं , मांडवी , वांगी , सिलेगांव 2, मच्छेरा, रुपेरा , तामसवाडी (सि) 2, सिहोरा 2, 6 मोहाड़ी खापा 1 सिंदपुरी 1 , देवरीदेव 1 , मुरली सीतासावंगी 3 पवनारा 2, सुंदरटोला , हिंगना , बघेड़ा 1, 3 बपेरा (आं ) 1, आंबागड़ 1 , रामपुर , गोंडिटोला (आलेसूर ) , मंगरली , देवसर्रा , महालगावं , पवनारखारी 2 असे एकूण 50 पदांकरीता अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार असून यांमध्ये शासन निर्णयांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. अर्जदारांनी
कोणत्याही आर्थिक दलालांच्या आमिशाला / भूलपाथाना बळी न पडण्याचे आव्हाहन योगिता परसमोडे बा.वि. प्र. अधिकारी यांनी केलेले आहे.