प्रतिनिधी/ जीवन वनवे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसगाव येथील घटना..
तुमसर:शिक्षण हा प्राथमिक शाळेतच करावा म्हणणं आहे. पण शासनाचे लक्ष नाही. मग करावा तरी काय अशीच एक घटना जिल्हा परिषद उसगाव शाळेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसगाव येथील शिकवणी वर्ग सुरू असताना वर्गाच्या छताच्या काही भाग तुटून मुलीच्या डोक्यावर पडला. सुदैवाने मुलगी बचावली. तेथील जिल्हा परिषद सदस्य सौ. नेवारे यांनी मा. रमेश भाऊ पारधी भंडारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती यांना सदर घटनेची माहिती मोबाईल द्वारे देण्यात आली. वेळ न गमावता तात्काळ दखल घेत.जिल्हा परिषद प्राथमिक उसगाव शाळेला यांनी भेट देऊन घटनेची चौकशी करून पूर्ण वर्ग खोल्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी यांचे आदेश देण्यात आले.