भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
तुमसर:- कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती व त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी आपले सैनिक स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही, फक्त देशाचाच विचार करतात. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्यच आहे. याची जाण प्रत्येकाला असणे महत्त्वाचे आहे. या उदात्त भावनेचे स्मरण ठेवत छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने कारगिल चौक माकडे नगर तुमसर येथील कारगिल स्मारकाला भेट देऊन व वीर जवानांचे स्मरण करत हुतात्मा स्मारकाला माल्यार्पण व असंख्य दीप प्रज्वलन करून मानवंदना देण्यात आली यावेळी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक /अध्यक्ष इंजि. नितीन धांडे उपाध्यक्ष विक्की साठवने, सचिव प्रा. अमोल उमरकर प्रतिष्ठानचे निष्ठावंत मावळे प्रशांत वासनिक, नितीन सार्वे, अंकुश गभने, गीतेश गणोरकर, युवनेश धांडे इत्यादींच्या उपस्थितीत व रिटायर्ड इंडियन आर्मी कमांडो व कारगिल युद्धात महत्वाचे योगदान देणारे श्री. राजीक शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तुत कार्यक्रम पार पडला यावेळी आर्मी कमांडो श्री. राजीक शेख यांनी आजचा हा दिवस प्रत्येक शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयीन स्तरावर हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जावा या दिवशी युद्धात कामी आलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून राष्ट्रगीत म्हणुन आदरांजली द्यावी असे सुचवले तर प्रतिष्ठान च्या वतीने उपरोक्त सूचनेचे समर्थन करीत वरच्या स्तरावर निवेदन देऊन मागणी करण्याचे आश्वासन दिले.