



तुमसर/ तुषार कमल पशिने
भंडारा ;- महाराष्ट्र राज्यामध्ये ए.सी एसटी प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यां करिता शासनाने वसतिगृह सुरू करावे अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चानाने लावून धरण्यात आली होती अखेर राज्यातील 72 वसतिगृह हे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र हे करतांना संबंधित शासन आदेशातील अभ्यासक्रम दुरूस्तीच्या मंत्र्यांना विसर पडला राज्यशासनाने ओबीसी करिता प्रत्येकी जिल्हात दोन वसतिगृह मूल-मुलीं करिता सुरू करावी.अशी मागणी विधानसभेत लावून धरण्यात आली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्य केल्यानंतर वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लागला पण त्यामध्ये ओबीसी मंत्र्यालयाने ही वसतिगृहे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्यासाठी 13 मार्च 2023 च्या शासन निर्णयात नोंद केल्यामुळे ओबीसी विद्यार्थी 11-12 वि BA., B.sc,B.com व इतर पारंपरिक अभ्यास क्रमाच्या ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे.ओबीसी वस्तीगृहाची प्रक्रिया सुरू होऊन 15 आगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करू असे ओबीसी मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले पंरतु शासन निर्णयात दुरुस्ती केली नाही तर पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या 11-12 आणि BA., B.sc,B.com इतर विद्यार्थ्यांना शासनाचा मोफत वस्तीगृहाचा लाभ घेता येणार नाही म्हणून ओबीसी वसतिगृह पारंपरिक शिक्षणाचा समावेश केलेला शासन निर्णय काढण्यात यावा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते व ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी मंत्री अतुल साळवे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे.
अद्यापही भंडारा जिल्ह्यामध्ये वस्तीगृहाकरिता शासन प्रक्रिया सुरू झालेली नाही ती लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा ओबीसी क्रांती मोर्चाच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल.(ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते)