भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
शेतकरी परत सावकाराच्या दारात उभा पणन विभागाची हिटलर शाही
तुमसर : रब्बी हंगामातील धानाची १ जून ते ३०जून या कालावधीत शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. खरीप हंगामाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना नातेवाइकांकडे उधारी, उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.
भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील खरेदी करण्यात आली असून, बराच धान साठा भरडाईसाठी उचल करण्यात आला. जिल्हा कार्यालयाकडून अधिकृत मिलर्सला धान भरडाईसाठी डी.ओ. देण्यात येतात. काही मिलर्स वेळीच धानाची उचल करीत नाहीत. परंतू जे मिल मालक धानाची उचल करतात त्यांना डी.ओ.नुसार धानाची डिलेव्हरी देण्यात येते. व डी.ओ.नुसार मालाची डीलेव्हरी दिल्यानंतर वेळीच डी.ओ. धान खरेदी केंद्रावरून पोर्टलवर ऑनलाईन नोंद करण्यात येते त्या डी. ओ. वर संबंधीत मिल मालकांची किंवा त्यांच्या प्रतिनिधीची डी. ओ. नुसार माल मिळाल्याची स्विकृतीची डी. ओ. वर सही असते.जे मिलर्सला आपले जिल्हा कार्यालयाकडून डी.ओ. देण्यात येतोव तो डी. ओ. नुसार माल मिळाल्याची स्विकृती ऑनलाईन पोर्टलवर नोंद करीत नसेल तर त्या मिलर्सची चुक आहे त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करावी व त्या मिलर्स कडून स्विकृती येत नाही तो पर्यंत नविन डि.ओ. देण्यात येवू नये. डी.ओ. ऑनलाईन संस्था व मिलर्स करतात हया प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा काही संबंध येत नाही, असे असतांना शेतकऱ्यांचे धान चुकारे थांबविणे, वेटीस धरणे योग्य नाही. गत महिन्यापासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चुकाऱ्यांसाठी बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवत असल्याचे चित्र आहे.
कोणतेही कारण नसतांना शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे थांबविणे ही एक प्रकारे पणन विभागाची हुकूमशाही आहे सद्य:स्थितीत खरीप हंगामातील धानाची रोवणी सुरू असून, त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, स्वत:च्या विकलेल्या धानाचे पैसे शेतकऱ्यांना न मिळणे ही शोकांतिका आहे.
ठाकचंद मुंगूसमारे जिल्हा सचिव, भंडारा जिल्हा धान खरेदी संघटना