![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती श्री संदीपजी टाले, जिल्हा परिषद सदस्य श्री उमेशजी पाटील व जिल्हा परिषद सदस्य ध्रुपता मेहर यांनी आज विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे भाजपामध्ये प्रवेश केला.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसची वाट धरू पाहणाऱ्या या दोन सदस्यांना योग्य मार्ग दाखवण्यात यश आले. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करा. खूप खूप शुभेच्छा.यावेळी सोबत डॉ उल्हास जी फडके उपस्थित होते.