![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातुर जिल्हा प्रतिनिधी/ नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील चापोली येथील डॉ. नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून डी. फार्मसी अभ्यासक्र सुरु करण्यास फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांच्याकडून नुकतीच परवानगी देण्यात आली असून यामुळे चाकूर व अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षण महर्षी कर्मयोगी डॉ. नारायणराव चाटे यांच्या अथक प्रयत्नातून नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली या संस्थेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेसाठी शिक्षण देण्याचे काम १९६४ पासून केले जात आहे. चापोली येथील संजीवनी महाविद्यालयामध्ये ११वी, १२वी (कला, वाणिज्य व विज्ञान), बी.ए., बी.एस्सी., बी. कॉम., ११ विषयात एम.ए., एम. एस्सी. रसायनशास्त्र, एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र, एम. एस्सी. दुग्धशास्त्र, एम. एस्सी. गणित, एम. एस्सी. भौतिकशास्त्र, एम. कॉम., बीसीए, बीसीएस, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी.ए. या अभ्यासक्रमाची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
शिक्षण महर्षी डॉ. नारायणराव चाटे यांनी के.जी. टू पी.जी. पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागातील व वाडी तांड्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांचे स्वप्न होते ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना व्यवसायाभिमुक तंत्र शिक्षणाचीही सुविधा उपलब्ध व्हावी या त्यांच्या संकल्पनेनुसार व त्यांच्या हातूनच प्रस्तावित झालेल्या डॉ. नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास डी. फार्मसी अभ्यासक्रमास परवानगी मिळालेली असल्याने शिक्षण संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सेवेची व्याप्ती वाढलेली आहे.
चापोली सारख्या ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी मजुरांच्या मुला-मुलींना देखील डी. फार्मसी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून दरवर्षी ६० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे सचिव डॉ. भालचंद्र चाटे व प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे यांनी केले आहे.