![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील आरोग्य तपासणी पथकाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा येथे शालेय विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली सध्या ग्रामीण भागात डोळ्याच्या साथीच्या आजाराने थैमान घातले असुन लहान- थोर सर्वंच या आजाराने त्रस्त आहेत
शाळकरी मुलांसाठी ही तपासणी वरदान ठरत असुन गंभीर आजाराची मुले पुढील संदर्भिय सेवेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवली जातात या अभियाना अंर्तगत प्रत्येक विद्यार्थांना आरोग्य कार्ड देवून वजन, उंची, लक्षणे ई बाबींची त्यात नोंद ठेवण्यात येते पालकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन शाळेतील शिक्षक श्री पवार एस बी यांनी केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर चे वैद्यकीय अधिकारी श्री बालासाहेब मुंढे, श्रीमती नागराळे आर बी (ए एन एम ), श्रीमती भायमारे स्वाती (फार्मासिस्ट) तसेच मुख्याध्यापक श्री मद्देवाड ए के,श्री गुळवे एस पी आदी उपस्थित होते.