![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
स्थानिक अर्जुनी / मोर. – न्यू मून इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर काॅलेज अर्जुनी/मोर. येथे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! असे म्हणणारे भारतीय स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक कवी, प्रबोधनकार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळा समिती सचिव ओमप्रकाशसिंह पवार, प्रा. राकेश उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे व त्रिवेणी थेर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यापर्ण करण्यात आले. अध्यापिका कुंजना बडवाईक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. लोकमान्य टिळक यांच्या संपूर्ण जीवन कार्याची माहिती अध्यापिका त्रिवेणी थेर यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुरज मोटघरे, प्रा. नागपूरे, देविदास बांडे, लीना चचाणे, हीना लांजेवार, प्रतीक्षा राऊत, यामिनी भंडारी, आरती मुंगूलमारे यांनी सहकार्य केले.