![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- हालाकीच्या परिस्थीती वर मात करुन एकल महिलांनी समाज प्रवाहात सन्मानाने जगण्यासाठी उभारलेल्या एकल महिला संघटनेच्या वतीने उपजिल्हा आधिकारी उदगीर,यांना मणिपुर प्रकरणी निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,हे निवेदन दि.३/८/२०२३ रोजी उपजिल्हा आधिकारी उदगीर यांच्याकडे देण्यात आले आहे,मागिल तिन महिण्यापासुन जातिय वादातुन महिलावर आत्याचार करुन त्या महिलांना निवस्त्र करुन भर रस्त्यावर त्यांची हजारो पुरुषांनी धिंड काढली,व या घटनेला विरोध करणाऱ्या दोन तरुणांचा खुन करण्यात आला ही घटना देशाला काळीमा फासणारी घटना आहे,आशी भावना निवेदनात नमुद करण्यात येऊन या बाबद,दुख व्यक्त करण्यात आले आहे,इतक्या भयानक झालेल्या घटनाक्रम काळात मणिपुर राज्य शासन व केंद्र शासन गप्प राहिले बाबद संताप ही निवेदनाव्दारे व्यक्त करण्यात आला आहे,हा प्रकार लयास गेलेली राजकीय नितिमत्ता पुरुषी अहंकार,जातिय वाद,धर्मवाद,वर्णवाद संपुष्टात आणुन देशातील सर्वाना समानता स्वंरक्षण देणे महत्वाचे आहे आसे ही निवेदनात नमुद करण्यात आले आहे,मात्र आशा प्रकरणी कठोर कार्यवाही होत नसल्याने आसे प्रकार महिला सोबत होत आहेत,आसे ही निवेदनाव्दारे कळविण्यात आले आहे,आज ही तिथंली परिस्थीती सुधारलेली दिसुन येत नाही,तेथील परीस्थीती सुधारण्यात यावी व आत्याचार करणार्या लोकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आशी मागणी एकल महिला संघटना व श्रमीक क्रांतीच्या वतीने करण्यात आली आहे,या वेळी एकल महिला संघटना व श्रमीक क्रांतीच्या जळकोट महिला आघाडी प्रमुख आनिता गायकवाड,उदगीर महिला आघाडी प्रमुख प्रतिभा येळगे,श्रमीक क्रांती आभियानाचे गोविंद शिंदे,काशिनाथ कांबळे मारुती कांबळे वएकल महिला संघटनेचे पारुबाई कांबळे,मंगलाबाई कांबळे,मुद्रीका कांबळे,मैनाबाई कांबळे,इत्यादी उपस्थीत होते.