![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उमरवाडा येथील आशा वर्कर पदभरती प्रकरण चिघळणार …
भंडारा जिल्हा प्रतिनिधी:- जीवन वनवे
तुमसर:- आशा वर्कर या पदासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार दिपाली भावेश घडले हिला सर्वात जास्त गुण मिळून सुद्धा नाकारले जात आहे.शासन दरबारी गुहार लावल्यानंतर सुद्धा तीला न्याय मिळेल काय?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.उमरवाडा येथील आशा वर्कर पदभरती प्रकरण चिघळू नये, याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर गावात तणाव निर्माण होणार नाही व अन्याय ग्रस्ताला न्याय मिळेल,हे विशेष! या बाबत सविस्तर असे की,
तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावात दि १९/५/२०२३ला आशा वर्कर पदाकरिता आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्यांने निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यात गावातील लोकांनी जवळपास २० फॉर्म भरले. आशा वर्कर पद भरती संदर्भातील नियम व अटीप्रमाणे निवड करताना पहिल्या ३ पैकी
१. दिपाली भावेश घडले — ११
२. स्वाती प्रदीप लाडसे — ८
३. प्रतिमा गणेश बनकर— ७
असे गुण प्राप्त झाले. आशा वर्कर पदभरती करिता गुणानुक्रमाणे ग्रामसभेत निवड करण्यात यावी असे नियम सांगते. दि. ६/६/२०२३ला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गुणानुक्रमाणे निवड न करता मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येईल असे ग्रामपंचायत सचिव मुरकुटे मॅडम यांनी सांगितले आणि सदर प्रक्रिया राबवणे सुरू केले. सभेतील काही लोकांनी आरोग्य विभागाद्वारे दिलेल्या गुणांची यादी तपासली असता त्यात प्रियंका गणेश बोरकर यांना सुद्धा ७ गुण असल्याचे सांगितले आणि पहिल्या ३ मध्ये तिचे सुद्धा नाव घालण्यात आले आणि असे १ आशा वर्कर पदाकरिता ४ मधून निवड होईल असे त्यात जाहीर करण्यात आले. जेव्हा ३ आणि ४ क्रमांक असलेल्या दोन महिलांना समान गुण प्राप्त झाले असता त्या दोघांपैकी एकाची निवड न करता दोघांनाही संधी देण्यात आली. सर्वात जास्त गुण प्राप्त असलेली दिपाली भावेश घडले यांनी मतदान प्रक्रिया आणि पहिल्या ३ महिला मध्ये ४ कशी? असा आक्षेप नोंदवला असता विषय स्थगित करून सभा पुढे नेण्यात आली. दिपाली भावेश घडले यांनी या चुकीच्या प्रक्रियेसंदर्भात अर्जाद्वारे माननीय खंडविकास अधिकारी साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी, सभापती साहेब पंचायत समिती तुमसर यांना कळविण्यात आले होते. दि. २५/०७/२०२३ ला पुन्हा विशेष ग्रामसभा घेण्याचे नोटीस २१/७/२०२३ला काढण्यात आले. आणि २२/७/२०२३ ला गावात नोटीस बोर्डावर लावण्यात आले. ग्रामसभेच्या नियमांना डावलुन अवघ्या ३ दिवसातच सभा घेण्यात आली. ग्रामपंचायतीला एवढी घाई कशी झाली हे माहिती नाही.
ग्रामसभा सुरू असतांना प्रतिमा गणेश बनकर आणि प्रियंका गणेश बोरकर या दोन गटात पुरुषांचे भांडण सुरू झाले आणि त्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी कडव यांचा चष्मा तुटला, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद उपरिकर यांना मानेला दुखापत झाली. वातावरण प्रचंड तापलं असतांना सुद्धा ग्रामपंचायत सचिवाने सभा पुन्हा सुरू केली आणि बहुमतदान प्रक्रियेद्वारे त्यांनी आशा पदाच्या निवडणुकीला सुरुवात केली. वर्तमान ग्रामपंचायत सदस्य कारू किरणापुरे यांनी या प्रक्रियेला विरोध केला असता त्यांना न जुमानता ही प्रक्रिया पुढे नेण्यात आले. त्यात पहिल्या सर्वाधिक ११ गुण प्राप्त असलेल्या दिपाली भावेश घडले यांचे प्रथम नाव घेण्यात आले तर त्यांनी या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला आणि ही पध्दत बेकायदेशीर आहे असे ग्रामपंचायत सचिवाला सांगितले तर सचिव मुरकुटे मॅडम बोलल्या की या सभेत तुम्हाला आक्षेप घेता येणार नाही आणि मी यासंदर्भात प्रोसिडिंग बुकवर सुद्धा काही नोंदवणार नाही . ही निवड मला आज कोणत्याही परिस्थितीत घेणे आहे असे सांगितले. दुसऱ्या क्रमांकावर असलेली स्वाती प्रदीप लाडसे हिचे नाव घेता गैरहजर असल्याचे दाखवण्यात आले आणि ती बाई भांडन होण्यापूर्वी कोरम बुकवर तिची उपस्थिती ची नोंद करून गेली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रतिमा गणेश बनकर यांचे नाव घेऊन समर्थनावर हात वर करा असे सांगण्यात आले. हात मोजता येत नाही अडचण सांगत सचिवाने गेट बंद करायला सांगितले आणि चवथ्या क्रमांकावर असलेल्या प्रियंका गणेश बोरकर या दोघात मतदान प्रक्रिया बोटाला शाही लावत पूर्ण करण्यात आली. त्यात सर्वाधिक जास्त मतदान प्रियंका गणेश बोरकर हिला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
कोरम बुक वर एकूण ४०६ आणि मतदान प्रक्रियेत ३६४ लोकांची नोंद झाली असता उर्वरित ४२ लोकांची सहमती किंवा असहमती का घेण्यात आली नाही. आशा वर्कर पदाकरिता झालेल्या या बेकायदेशीर निवडप्रक्रिये बाबत दिपाली भावेश घडले यांनी कार्यकारी अधिकारी भंडारा आणि प्रतिलिपीत जिल्हाधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, खंडविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना घडलेल्या घटने संदर्भात अर्जाद्वारे कळविण्यात आले आहे आणि जर यावर नियमाप्रमाणे कार्यवाही या अधिकाऱ्यांनी जर घेतली नाही तर पंचायत समिती तुमसरच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा सौ. दीपाली भावेश घडले यांनी दिला आहे.