
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
नोकरशाही आणि इतर व्यवस्थेमुळे विविध समस्यांचा सामना करीत त्या सुटाव्या या आशेने धडपडणाऱ्या अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आज समाधान दिसले ते या जनता दरबारानंतर. लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनसंपर्क_कार्यालय भंडारा येथे उपस्थित अनेक नागरिकांनी त्यांच्या व्यथा घेऊन भेट घेतली. वेगवेगळ्या विषयाशी आणि विभागाशी संबंधित या समस्या ऐकून घेत, प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून आलेल्या लोकांच्या समस्या मार्गी लावल्या. चिंताग्रस्त चेहऱ्याने समस्या घेऊन आलेला प्रत्येक जण तोडगा निघाल्याचे समाधान घेऊन बाहेर पडताना दिसला.






Total Users : 883140
Total views : 6488584
