![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी:-जीवन वनवे
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर
तुमसर येथे मागील काही दिवसांपासून संपूर्ण शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असून परिसरात दहशतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा भुरटय़ा चोरांना पकडून यांचेवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात जनतेच्या संरक्षणार्थ उपयुक्त अशी पाउले उचलावीत व शहरातील किंबहुना शहराच्या आतमधील छोट्या चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे या सारख्या यंत्रणा बसवाव्यात ज्यामुळे या घटनांना आळा बसेल अश्या स्वरूपाचे निवेदन समस्त जनतेच्या वतीने दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिस स्टेशन तुमसर येथे देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, सचिव प्रा. अमोल उमरकर, प्रतिष्ठान चे मावळे नितिन सार्वे, प्रशांत वासनिक, अंकुश गभणे, गीतेश गनोरकर, अंकित तुमसरे, निवृत्त आर्मी शिपाई दादाराम सपाटे, रविभाऊ सार्वे इत्यादी व इतर नागरिक उपस्थित होते.