![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
महाराष्ट्र चेस असोसिएशन तर्फे ‘अॅड. संकेत फुके मेमोरिअल ६० वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १६ ते २६ ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा पार पडतील. पत्रकार परिषद घेत यासंबंधी सविस्तर माहिती दिली.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ६ लाख रुपयांचे पारितोषिक तर एकूण बक्षीसाची रक्कम ३० लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. २५ राज्यांतील ३५९ खेळाडू यात सहभागी होतील.
पत्रकार परिषदेवेळी ग्रँड मास्टर तथा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष श्री अभिजित कुंटे जी, श्री अनिरुद्ध देशपांडे जी, सचिव श्री निरंजन गोडबोले जी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ मयूर जी यासह पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.