



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
आज राजाभोज पोवार समाज समिती, तुमसर च्या पदाधिकारी यांनी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांची भेट घेवुन समाजाच्या विकासकामे करीता आणि समाज बांधवांच्या अडचणी सोडविण्याकरीता निवेदन दिले.
यावेळी विकास कामे आणि समस्या लक्षात घेवुन त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन आमदार साहेब यांनी दिले सदर निवेदन देतांना समितीचे अध्यक्ष श्री. राजेशजी ठाकुर, उपाध्यक्ष श्री. विश्वजीतजी पुंडे, सचिव श्री. अभिमन्युजी पटले, सहसचिव श्री. श्यामभाऊ भैरम, श्री. राजुजी कटरे, कोषाध्यक्ष श्री. डॉ. विजयजी पारधी आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.