



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
“मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत भंडारा शहरातील वीर जवानांना नमन करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आणि सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला. वीर जवानांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरू शकत नाही अशा कुटुंबाची देशावर अपार असल्याचे मत, यावेळी मी व्यक्त केले.
दुसऱ्या एका सोहळ्यात शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील एका बालोद्यानाचे नामकरण “शहीद नायक चंद्रशेखर भोंडे” असे करण्यात आले. चंद्रशेखर हा मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होता. जो कर्तव्य बजावताना शहीद झाला. या नामफलकाचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार श्री.नरेंद्रजी भोंडेकर, जिल्हाधिकारी श्री.योगेशजी कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.लोहितजी मतानी, श्री.विनोदजी जाधव, श्री.मुकेशजी साकुरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.