![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/ विलास मारोती होलगीलवार
करंजी रोड:- 77 वा स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात साजरा होत असताना करंजी येथे देखील विविध ठिकाणी सुवर्ण महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सोबतच देशाच्या रक्षणासाठी झटणारे माजी सैनिक पूडलिक कुळसंगे भीमराव मेश्राम विष्णू गेडाम यांचा ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य समुदायासमोर शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले माजी सैनिकांचा सत्कार हा भावी पिढीतील तरुण मंडळींना एक संदेश देणारा समजला जातो सुवर्ण महोत्सवाला प्रत्येक घरोघरी जनतेने राष्ट्रीय ध्वज लावून सन्मानित केले व झालेल्या अनेक ठिकाणी जनतेने झेंडावंदनाला उपस्थिती दिली सोबतच ईरा इंग्लिश मीडियम स्कूल, स्कायलर इंग्लिश मीडियम स्कूल, पोलीस चौकी, करंजी कॉटन मार्केट, जिल्हा परिषद शाळा ,ग्रामीण रुग्णालय करंजी ग्रामपंचायत कार्यालय करंजी ,महामार्ग पोलीस केंद्र करंजी सर्वत्र सुवर्ण महोत्सव साजरा झेंडावंदन करण्यात आले