



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
नुकतेच ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दिनांक 12 व 13 ऑगस्टला म्हणजे शनिवारी रात्री 10.30 ते रविवार सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 10 तासांत तब्बल 18 रूग्णांचा मृत्यू झाला याचा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसला.यामुळे असे वाटत आहे की सरकारी रुग्णालयाची हालत गंभीर अवस्थेत असल्याचे दिसून येते.आजच्या परिस्थितीत सरकारी रूग्णांलया सोबतच सरकारी शिक्षण संस्था सुध्दा अत्यंत दैनीय अवस्थेत दिसून येते.ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात एकाच दिवशी 18 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली.यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व सरकारी यंत्रणा ॲक्टिव्ह मोडवर आली आहे.आता प्रश्न आहे की उपराजधानीतील मेडिकल आणि मेयोत होणाऱ्या मृत्यूंचे काय? मेडिकल आणि मेयोत मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात अशी माहिती पुढे आली आहे.मेडिकलमध्ये आठवड्याभरात 108 रूग्णांचा मृत्यू तर मेयोत 43 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणातील गरिबांचा आधार मेडिकल आहे.परराज्यातील 30 टक्के रूग्ण मेडिकलमध्ये येतात.दरवर्षी 7 लाख रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते.येथील गर्दीमुळे रूग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचे विदारक वास्तव आहे.त्यामुळे प्रश्न आहे की उपराजधानीत होणाऱ्या मृत्यूंची दखल सरकार घेणार का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांसमोर उद्भभवतांना दिसते.सरकारी रूग्णांलये मग मनपाची असो वा शासनाची असो वा जिल्हा परिषदांची असो वा ई.एस.आय.सी. या संपूर्ण रूग्णांलयांची अत्यंत वाईट अवस्था असल्याचे सध्याच्या घटनेवरून दिसून येते.कारण रूग्णांना औषधी,रक्त डोनेट, रक्त चाचणी, एक्सरे इत्यादी अनेक गोष्टींसाठी भटकावे लागते व झुंझ द्यावी लागते यामुळे रूग्णांचे नातेवाईक हताश होतांना आपण पहातो व अशा परिस्थितीत रूग्णांचा वेळीच उपचार झाला नाही तर रूग्ण दगावतात सुध्दा. राज्यातील काही बोटावर मोजण्या इतकी मुख्य रूग्णांलये सोडली तर आजही राज्यात अनेक सरकारी रुग्णालये अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत याचे जिवंत उदाहरण आपल्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दिसून आले.यामुळेच खाजगी रुग्णालयांची आपल्याला चांदी दिसून येते.सरकारी रूग्णालयात रूग्णांना योग्य सुविधा व उपचार योग्यवेळी मिळत नसल्याने अनेक रूग्ण दगावतात.अशा परिस्थितीत गरीब व सर्वसामान्यांचा कल खाजगी रुग्णालयाकडे जातो.परंतु पैशांच्या अभावामुळे सरकारी रुग्णालयातच आश्र घ्यावाच लागतो अशा परिस्थितीत औषधोपचार सुरळीत झाला नाही किंवा बाहेरून औषधी आनण्याकरीता पैशांच्या अभावामुळे रूग्ण दगावतात ही सत्य परिस्थिती आहे.शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालये आपल्याला दिसून येते.रूग्णांच्या खिशात पैसा असेपर्यंत खाजगी रूग्णालये रूग्णांचा उपचार मोठ्या थाटामाटात करतात.परंतु पैसा संपल्यानंतर संवेदनाहीन होते व मानुसकीची जबाबदारी सोडून खाजगी रूग्णालयातून थेट ॲम्ब्युलन्स मार्फत मेडिकल किंवा मेयोत रूग्णाला पाठवले जाते.ही रूग्णालये सरकारी असल्यामुळे दाखल करावेच लागते.खाजगी रूग्णालयातुन सरकारी रूग्णांलयात येणारे जास्ततर रूग्ण अत्यवस्थ किंवा शेवटच्या घटका मोजणारे असतात.यामुळे मेडिकलमध्ये उपचारादरम्यान दररोज 16 हून अधिक रूग्ण दगावतात तर मेयोत दररोज किमान 7 रूग्ण अखेरचा श्वास घेतात असे सांगितले जाते.हा अत्यंत गंभीर व चिंताजनक विषय आहे.राज्याची वाढती लोकसंख्या व सरकारी रूग्णांलयात रूग्णांची होणारी गैरसोय यांवर अंकुश लावण्यासाठी सरकारने सर्वप्रथम खाजगी रूग्णालयाच्या मुस्क्या आवळायला पाहिजे.तेव्हाच आपल्याला सरकारी रूग्णांलयात स्थिरता दिसून येईल व सर्वसामान्यांना योग्य उपचार मिळेल.सरकारला खाजगी रुग्णालये किंवा सरकारी रुग्णालये यातील तफावत पहायची असेल तर राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या परिवारांचा संपूर्ण उपचार सरकारी रूग्णांलयात घ्यावा व त्यात काय-काय अडी-अडचणी येतात ते जाहीरपणे जनतेला सांगावे.यातुन आपल्याला कळेल की सरकारी रुग्णालयाच्या काय अडचणी आहेत. खाजगी रूग्णांलयातील लुट थांबली तर सरकारी रुग्णालयात रूग्णांना योग्य उपचार मिळु शकतील. जोपर्यंत सरकार सर्वसामान्यांकडुन होणारी खाजगी रुग्णालयांतील लुट थांबवित नाही तोपर्यंत सरकारी रूग्णांलयांमध्ये सुधारणा होणार नाही हेही तितकेच सत्य आहे.आजच्या परिस्थितीत सरकारने मुख्यत्वे करून आरोग्य आणि शिक्षण विभाग यांच्यातील खाजगीकरणावर अंकुश लावायलाच हवा तेव्हाच सर्वसामान्यांना योग्य न्याय मिळेल.सध्याच्या परिस्थितीत राज्यात सर्वात जास्त महागडे असेल तर आरोग्य आणि शिक्षण.त्यामुळे हा अत्यंत गंभीर व चिंताजनक विषय आहे यावर सरकारने गांभीर्याने विचार करून सर्वसामान्यांना योग्य न्याय द्यावा.हिच अपेक्षा!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.