![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर: राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमसर तर्फे तुमसर नगर परिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ जी मेश्राम यांना निवेदन देण्यात आले त्या मध्ये,पावसाळा सुरु झाला असुन तुमसर शहरात डेंगु आणि मलेरीया सारखे धोकादायक संक्रमण मोठया प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी मोठया प्रमाणात दिसुन येत आहे. तुमसर शहरात डेंगुचा प्रादुर्भाव वाढ होऊ नये म्हणुन शहरातील प्रत्येक प्रभागात नियमितपणे जंतुनाशक फवारणी करण्यात यावी व ज्या भागात पाणी साठवुन राहतो त्या ठिकाणी तो पाणी काढण्याची उपाय योजना करावी. याचे आव्हान करुन जनतेला सतर्क करावे.असे सांगत इंजि. सागर गभने यांनी मुख्याधिकारी सी चर्चा केली की जे रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपचारा करिता येतात त्यात डेंगू व मलेरिया चे रुग्ण आढल्यास रुग्णालयातुन तात्काळ नगर परिषद ला कळवण्यात येणार व त्या रुग्णाच्या घर व परिसरात जंतूनासक ची फवारणी करण्यात येईल. इंजि.सागर गभणे यांनी सांगितले की वेळ आल्यास आम्ही नगर परिषद कर्मचाऱ्यां सोबत रस्त्यावर उतरून जण जागृती करत लोकांना संक्रमणा पासून बचावण्याचा प्रयत्न करू. निवेदन देतांनी राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष इंजि.सागर गभणे, प्रदीप भरणेकर प्रदेश सचिव रा.यु.कॉ., नानू परमार, राहुल रणदिवे,ओम करमकर, संकेत गजभिये, अक्षय शामकुल,अजय सिडाम, जुबेर शेख,आकाश मेशराम व कार्यकर्ते उपस्थित होते.