![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना अध्यक्ष सागर समुद्रवार यांचे प्रतिपादन…
आपसातील मतभेद बाजुला ठेवुन कलाल-कलार समाजाने आता सामाजिक एकता सिध्द करणे काळाची गरज आहे त्यासाठी कलाल-कलार समाज बांधवानी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी महामंडळ मिळण्यासाठी एकतेची वज्रमूठ बांधली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना अध्यक्ष सागर समुद्रवार यांनी केले स्थनिक विश्रामगृहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते राज्यात भगवान सहस्त्रबाहु अर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी सर्वांनी समाजाची एकता सिध्द करावी असे आवाहन ही सागर समुद्रवार यांनी केले आज महाराष्ट्र भर कलाल-कलार समाजाचा जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या अनुशंगाने आंदोलन केली जात आहेत परंतु पाहिजे त्या प्रमाणपत्र जिल्हा प्रशासन व राज्य सरकार आंदोलनाची सरकार दखल घेत नाही त्यामुळे आपल्या पिढीचे भविष्य बदलण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र येऊन अन्यायकारी व्यवस्थेवर घाला घालणे गरजेचे आहे येत्या काही दिवसात जन आंदोलन ऊभारून महामंडळासाठी मोहिम सुरूवात करण्यात येईल त्यासाठी सर्व वर्गिय व सर्व शाखीय पदाधिकारी यांनी जिल्हास्तरावर बैठकिचे आयोजन करावे असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना राज्य सरचिटणीस संतोष खंबलवार महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ सिमा खंबलवार विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुरेश मेश्राम विदर्भ महीला अध्यक्ष सौ रेखा प्रिंपाळे अमरावती जिल्हा अध्यक्ष नंदलाल कावरे अकोला जिल्हा अध्यक्ष रवींद्र हटवार परभणी जिल्हा अध्यक्ष संजय हिवाळे युवक जिल्हा अध्यक्ष किशोर कावरे दिपक ऊके प्रामुख्याने उपस्थित होते