![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- आज दिनांक 5 सप्टेंबर मंगळवार रोजी अहमदपूर येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे भारतीय संस्कृतीचे भाष्यकार, थोर दर्शनकार ,अध्यात्म प्रवीण, शिक्षणतज्ञ ,स्वतंत्र भारताची उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती भारतरत्न श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.
“विद्वानम सर्वत्र पूज्यते” ही भारतीय संस्कृतीची परंपरा पुढे नेत नीतिमान… चिकित्सक ,विज्ञानोन्मुख पण अध्यात्म प्रवीण अशी पिढी घडविण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचे देशासाठी दिलेले योगदान फारच महत्त्वाचे आहे. त्यांच्या 40 वर्ष शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळेच 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस “शिक्षक गौरव दिन “म्हणून साजरा केला जातो.
शाळेचे प्रा. वि.मा. मु.श्रीराम क्षीरसागर सर मा. वि.मा.मु.श्री विवेक कुमठेकर सर ,शाळेच्या मा.उप.मु.सौ ठाकूर मॅडम पूर्व प्रा. वि.प्र. सौ ज्योती मॅडम शाळेच्या पर्यवेक्षिका सौ कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनीच केली असल्याकारणाने स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
तसेच ‘योगशिक्षक ‘ही पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे मु.श्री राम क्षीरसागर सर उप..मु. सौ.ठाकूर मॅडम , एम. ए. योगशास्त्र प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ.अंजली कुलकर्णी यांचा स्पर्धा परीक्षा प्रमुख सौ. कारभारी मॅडम व श्री चंदेल सर यांचा सत्कार करण्यात आला.
“शिका आणि मोठे व्हा”असे आशीर्वाद रुपी मार्गदर्शन करीत शाळेच्या उप.मु.सौ.ठाकूर मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
क्षेत्र कोणतेही असो किंवा विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती करू त्यामागे जे ज्ञान असते ते मानवाचेच. हे ज्ञान देतात ते शिक्षक. यामुळेच भारताची चंद्र झेप असो वा आदित्य यान ही मोहीम यशस्वी झाली आहे. मनुष्य कितीही उच्च पदावर असो.. प्रगती करो त्याचे श्रेय जाते ते शिक्षकांनाच.या शब्दात आदरणीय कुमठेकर सरांनी शिक्षकांचा सन्मान केला व सर्व शिक्षकांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आदर्श नागरिक घडवण्यासाठी, समाजाचे सुव्यवस्थित संचलन व्हावे यासाठी समाजाला दिशा देतात ते शिक्षकच. स्वतः आदर्श व्यक्ती ही समाजात शिक्षकांची प्रतिमा असते. त्यामुळे समाजातील शिक्षक सदैव आदरणीय असतात. अशा शब्दात शिक्षकांचा सन्मान करून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हृदयापासून आत्मीयतेने ज्ञान द्यावे व आपले कर्म कार्य प्रामाणिकपणे करावे अशी इच्छा आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.वि. मा. मु. श्रीराम क्षीरसागर यांनी केली.वंदे मातरम या गीत मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.