![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
(सकल धनगर समाजाच्या वतीने आवाहन )
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असून फक्त महाराष्ट्रातीलच धनगर समाज वंचित आहे. 1956 साली काळे कर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे मात्र देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगर ‘संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा नाही याचाच अर्थ असा आहे की धनगड समाज हा धनगरच आहे हे अनेक वेळा धनगर समाजातील आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, धनगर समाजातील नेते कार्यकर्ते यांनी सांगून लेखी देऊन सुद्धा त्या ऊपर मराठी,हिंदी,इंग्रजी भाषा लिपी अभ्यासकांनी पण इंग्रजी मध्ये बोलली जाणारी ‘र’ हे लिखाणात ‘ड ‘लिहिलं जातं आणि’ड ‘आणि र एकच आहेत असे सांगून सुद्धा धनगर समाज आरक्षणापासून वंचितच राहिलेला आहे.प्रत्येक निवडणुकीच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये धनगराला आरक्षण देण्यासंदर्भातला मुद्दा असतो पण सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न निकाली काढावा असं कुठल्याही राजकीय पक्षाला अथवा नेत्याला वाटत नाही त्यामुळे दिनांक 6 सप्टेंबर या दिवसापासून चौंडी येथे लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ म्हणजेच प्रेरणाशक्ती स्थळ आहे आणि त्या ठिकाणी यशवंत सेनेच्या वतीने काही यशवंत सैनिकांनी आपल्या न्याय हक्काच्या धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून उपोषण सुरू ठेवले आहे उपोषणाला बसलेल्या धनगर समाज बांधवांना ना पक्ष भेद ,ना शाखा भेद,धनगर सारा एक या श्रेय घोषवाक्य लक्षात ठेवून प्रोत्साहन ,समर्थन व पाठिंबा देण्यासाठी सर्व धनगर समाजातील विद्यार्थी ,युवक ,ज्येष्ठ बंधू व भगिनी यांनी माळेगाव यात्रा येथे बैठकीला उपस्थित राहून जे बांधव आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने माळेगाव यात्रा येथे 8 सप्टेंबर शुक्रवार ठीक ११ वाजता बैठक आयोजित केली आहे तरी अहमदपूर,उदगीर, लोहा, मुखेड,गंगाखेड विधानसभा मतदारसंघातीलसर्व धनगर समाज बांधवांनी त्या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.