![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/अविकुमार मेश्राम
अर्जुनी/मोर.- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्य न्यू मून इंग्लिश मीडियम हायस्कूल तथा ज्युनिअर काॅलेजमध्ये दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला. गोविंदा आला रे, गोपाळा या मराठमोळ्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन केले.
महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. या परंपरेनुसार शाळेत दहीहंडी फोडून गोपालकाला वितरित करण्यात आला. यानिमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राकेश उंदिरवाडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष छगन शहारे, नितेश क्षिरसागर, विशाखा समितीच्या सदस्या संगिता बुकावन, राधिका भेंडारकर, चेतना मेश्राम, प्रा.तारका रुखमोडे, नाजुका उंदिरवाडे उपस्थित होत्या. या दिनाचे औचित्य साधून राधाकृष्ण वेशभूषा, रॅम्प वाक् व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचे संरक्षण करून, संस्कृतीची जतन करण्यासाठी असे उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे हा प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू असल्याचे प्रतिपादन संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी केले. प्रा. राकेश उंदीरवाडे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता बन्सोड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार हीना लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुरज मोटघरे, प्रविण नागपूरे, देविदास बांडे, शीला बोरीकर, कुंजना बडवाईक, प्रतीक्षा राऊत, लीना चचाणे, यामिनी भंडारी, आरती मुंगूलमारे यांनी सहकार्य केले.