![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा : भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील विवेकानंद सभागृह तुमसर येथे , महाराष्ट्र शाहीर कलाकार परिषद पुणे अंतर्गत भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार संस्था तुमसर द्वारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोज शनिवारला सकाळी १०:०० वाजता लोककलावंतांच्या जिल्हास्तरीय भव्य मेळावा ,व कलावंतांच्या मार्गदर्शन प्रशिक्षण, आणि विविध स्पर्धात्मक शाहीर कलावंत मेळावा आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नंदू भाऊ रहांगडाले ( सभापती तुमसर )कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिलीपभाऊ सार्वे ( जि.प. सदस्य भंडारा ) हे होते. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.राजेश भाऊ सेलोकर ( सभापती भंडारा ) मा.वसंताजी कुंभरे ,शाहीर अरुणजी मेश्राम ,शाहीर रमेश जी रामटेके ,शाहीर रवींद्र जी मेश्राम ,भीम शाहीर प्रदीप जी कडबे ,भगवानजी लांजेवार ,पत्रकार लीलाधर वाडीभस्मे , शाहीर राजेंद्र बावनकुळे (मानधन समिती सदस्य नागपूर ) कार्यक्रमाचे आयोजक शाहीर गणेश जी देशमुख,यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा अर्चना करून दीप प्रज्वलित करण्यात आले. या कार्यक्रमाचे भिम शाहीर प्रदीप बागवान कडबे किरणापुर काचूरवाई , ता. रामटेक, जि. नागपूर ,यांनी भीम गीत गायनातून बुद्धामुळे शाहू आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन केले. त्याप्रसंगी भीम शाहीर प्रदीप कडबे यांचे शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ,मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाहीर अरुण मेश्राम ,रमेश रामटेके रवींद्र मेश्राम भगवान लांजेवार शाहीर राजेंद्र बावनकुळे गणेशजी देशमुख मधुकर फुलबांधे उदयभान पटले नारायण देशमुख अर्चना मोटघरे प्रवीण पाचे ज्योत्सना मेश्राम वर्षा शेंडे दीक्षा चव्हाण प्रभा पाटील वंदनाताई रमणदेवी राजू गजभिये संगीता वैद्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संचालन मा.नरेश देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन मंगेश मानापुरे यांनी मानले. या कार्यक्रमात शाहीर कलाकार मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.