कलार समाज स्नेहमिलन, सत्कार सोहळा संपन्न! तुमसरमध्ये भीमसंगीताचा जल्लोष! भीमकन्या कडूबाई खरात यांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध  संकटातील मुलांसाठी जीवनरेखा…1098 चाइल्ड हेल्पलाइन… बोटांनी बोलण्याच्या काळात ओठांनी बोलावे – श्री जयंत चावरे कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे परसवाडा येथे काँग्रेसला धक्का – अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश मौजा परसवाडा येथील कॉग्रेस पक्षातून भाजपा मध्ये पक्ष प्रवेश  कलचुरी एकता सर्ववर्गी संघ नागपुर महाराष्ट्र प्रदेश की ओर से ऐतिहासिक सामूहिक विवाह और परिचय सम्मेलन संपन्न! आज स्व मनोहरभाई पटेल की ११९ वी जयंती दिवस के उपलक्ष पर स्वर्णपदक वित्रक समारोह! आज स्व मनोहरभाई पटेल की ११९ वी जयंती दिवस के उपलक्ष पर स्वर्णपदक वित्रक समारोह!
1710994486762
1739073774320
df
IMG-20231030-WA0012
mamacha
ind
Indian Head Line photo

14 सप्टेंबर हिंदी दिवस-हिंदी दील की धडकण,तर मातृभाषा दील की आवाज! 

1710994486762
TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

हिंदी भाषा ही देशाचा “आधारस्तंभ” आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या शिक्षणामध्ये हिंदीला सक्तीची भाषा केलीच पाहिजे. देशात आनंदाची गोष्ट म्हणजे 2014 पासुन हिंदी भाषेचा प्रसार भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठ्या‍ प्रमाणात होत आहे. युनो सारख्या मोठ्या मंचावर दीवंगत नेता अटल बिहारी  वाजपेयी, सुष्मा स्वराज यांनी हिंदी भाषेत आपले विचार मांडुन देशाचा गौरव उंचावला आणि मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासुन संपूर्ण भारतात व जगात हिंदी भाषेचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे हि भारताच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि कौतुकास्पद बाब आहे याचं मी मनापासून स्वागत करतो.भारताची राष्ट्रभाषा हींदी आहे. तीला कुठेही तडा जाणार नाही याची जबाबदारी संपुर्ण भारतवासीयांची आहे. देशातील कोणताही व्यक्ती असो त्याला हिंदी भाषेचेज्ञान असायलाच पाहिजे. कारण हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून ओळखल्या जाते. हिंदी भाषा व प्रादेशिक भाषा या प्रत्येकाला येणे व समजने अती आवश्यक आहे. परंतु आताही भारतातील काही दीग्गज नेतागन व सिलेब्रेटी विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा इंग्रजीला खुपच महत्त्व देताना दिसतात हे योग्य नाही. परंतु पर्यायी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर व्हावयास पाहिजे.भारतीय भाषा बऱ्याच आहेत त्या समृध्दीही आहेत. पण दक्षिणेतील भाषा समजायला कठीण जातात. हिंदी भाषा मात्र सर्वानाच लवकर समजते व अवगत होते. सर्वच धर्माच्या लोकांना हिंदी भाषेची जान आहे.फक्त दक्षिण भारतातील काही राजकीय पुढारी हिंदी भाषेचा विरोध करतांना दिसतात. ते विदेशी इंग्रजी भाषा बोलायला तयार आहेत. परंतु हिंदी भाषा बोलायला किंवा ऐकायला तयार नाहीत, हे कीतपत योग्य म्हणावे ? भारतात अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक जाती आहेत. परंतु कोणीच आता पर्यंत हिंदीचा विरोध केलेला नाही. फक्त दक्षिणमध्येच हिंदीचा विरोध होतो.तामिळनाडुत करुणानिधी यांनी 1965 मध्ये हिंदी भाषेचाकडाडून विरोध केला होता व त्यावेळेस राज्यात हिंदी विरूद्ध आंदोलन उभारण्यात करूनानिधींचा मोठा वाटा होता. या आंदोलनाला हिंसक वळणसुध्दा लागले होते. शेवटी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशात “त्रिभाषा सूत्र”सुरूच राहील असे स्पष्ट केले होते व आंदोलन थांबले. हिंदी भाषेचा त्रास ज्यांना आहे त्यांनी आपल्या प्रादेशिक भाषेचा वापर अवश्य करायला हवा. आपण सर्व हिंदुस्थानात रहातो मग सर्वानाच हिंदी भाषा का येऊ नये ? आपण संपूर्ण देशात इंग्रजीभाषा सक्तीची करू शकतो मग हिंदी का नाही? भाषावाद पहाता 2014 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यानी निर्णय घेतला की केंद्र सरकारमधील सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर प्रामुख्याने हिंदीतून व्टिंट करण्यात यावे आणि इंग्रजी ही ऐच्छिक भाषा असेल असे जाहीर केले होते. कारण सर्वानाच हिंदी भाषा अवगत आहे भारतात 28 राज्य व 8 केंद्रशासीत प्रदेश आहेत त्यात जर एकट्या तामिळनाडू सारख्या राज्याचा हिंदी भाषेला आताही विरोध असेल तर ते योग्य नाही. आपली मूळात इंग्रजी भाषा नाहीच मग इतका इंग्रजीचा उहापोह कशाला? देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे.मग सर्वच राज्यात हिंदी हा विषय अनिवार्य का नाही? मी सरकारला आवर्जुन सांगेल की, आपली मातृभाषा (प्रादेशिक भाषा). आपली राष्ट्रभाषा व नंतर इंग्रजी भाषा सर्वच राज्यांत सक्तीची करावी. जो राजकीय नेता राष्ट्रभाषेचा विरोध करेल त्याला दंडीत केलेच पाहिजे. कारण राष्ट्रभाषेचा विरोध करने म्हणजे राष्ट्राचा अपमान करने होय असे मी समजतो. तामिळनाडुमधील अनेक लोक इतर राज्यात नौकरी किंवा व्यवसाय करीत आहेत त्यांना हिंदीची जान आहे मग तामिळनाडूच्या नेत्यांना हिंदीचा विरोध का? संपूर्ण देशाने हिंदी भाषेची जोपासना करावी त्याच सोबत संपूर्ण राजकीय पक्षांनी हिंदी भाषेचा वापर सर्वात जास्त करावा. संपूर्ण सरकारी कामे प्रादेशिक भाषेत किंवा हिंदीतुनच व्हावयास पाहिजे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होताच करुनानिधी, जयललिता, वायको, उमर अब्दुल्ला यांनी हिंदी भाषेला विरोध केला होता. त्याचबरोबर 2014 मध्ये जम्मु काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हनाले होते की, भारतासारखा खंडप्राय देशात अनेक भाषा आणि बोली बोलल्या जातात या देशातील धार्मिक आणि भाषिक संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहे अशा परीस्थितीत हिंदीचा अट्टाहास धरता येणार नाही असे त्यांनी त्यावेळेस म्हटले होते.भारतात अधिकृत 22 भाषा असल्या तरी भारतात 500 हुन अधिक महत्वपूर्ण भाषा आहेत. मग हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा दीलेला आहे त्याचे काय ? आपण स्वातंत्र्यात जगत आहोत त्यामुळे इंग्रजीचा जास्त लाड करने योग्य नाही.आजही प्रत्येक देशाला आपआपल्या राष्ट्रीय भाषेचा अभिमान आहे.त्याचप्रमाणे आपल्याला सुध्दा राष्ट्रभाषेचा अभिमान असायला हवा.परंतु आजही भारतात इंग्रजीला अधिक जवळ करतात हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.ही बाब सत्य आहे की, 2014 पासुन संपूर्ण भारत हिंदी भाषामय झालेला आहे यात तिळमात्र शंका नाही. 2014 पासून आजपर्यंत संपूर्ण जगभर हिंदीचा प्रसार सुध्दा होत आहे ही भारताकरीता स्वाभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. परंतु आताही भारतात काही हिंदी विरोधी आहेत त्यांना हिंदीचा पाठपढविने अत्यंत गरजेच आहे. देशात असेही प्रधानमंत्री होवुन गेले की त्यांनी हिंदीचा वापर नाहीच्या बरोबरीने केलेला आहे.त्याचप्रमाणे आताही अनेक सांसद हिंदी किंवा मातृभाषेचा वापर न करता संसदेत आपले विचार इंग्रजीत मांडतात.याकडे सुध्दा लक्ष वेधले पाहिजे. मनुष्य प्राणी हा बुध्दीजीवी आहे. त्याला सर्वच गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे जगात प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. त्याही शिकायल हरकत नाही यांनी ज्ञान वाढते. परंतु मातृभाष आणि राष्ट्रभाषेला विसरता कामा नये ही बाब सर्वानीच लक्षात ठेवले पाहिजे. माझ्या माहीतीनुसार जगात इतक्या भाषा नसतील तीतक्या भाषा भारतात आहे त्या शिकाव्यात. परंतु मातृभाषेचा व राष्ट्रभाषेचा विसर पडणार नाही याचीही काळजी व जबाबदारी सर्वांनीच घ्यावी.जगात भारत असा देश आहे की या ठिकाणी देव-दानव, साधु-संत, थोर महात्मे, थोर पुरुष,राजे-महाराजे,क्रांतीकारी,थोरविचारवंत इत्यादींच्या मंथनातून हा देश घडलेला आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाच्या व्यक्तीला भारतीय संस्कृती भारावते आणि त्याचा आनंद सुध्दा घेतात. त्यामुळेच आपल्या पुर्वजांनी हिंदी भाषा सरळ,सोपी व लवचिक बनवीली जेनेकरून ती सर्वान समजायला सोपी जाईल. हिंदी या शब्दात बरंच काही लपलेलं आहे.हिंदी पासुन हिंदुस्थानात, हिंदव स्वराज्य, जय हिंद, आझाद हिंद सेना असे अनेक महत्त्वपूर्ण उर्जा देणारे आणि क्रांतिकारी शब्दाशी हिंदीशी निगडित असुन जवळचे नाते आहे. ते सर्वानीच जपले पाहिजे, भारताला हिंदी व मातृभाषा ही आपल्या पुर्वजांनी दिलेली संजीवनी आहे.कारण यातुनच देवान-घेवान व संस्कृतीचे जतन होत असते.जय हिंद!      

 लेखक:-रमेश कृष्णराव लांजेवार                                     (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.

Leave a Comment

1710994486762
TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ
loader-image
BHANDARA GONDIA
12:27 pm, Feb 12, 2025
temperature icon 30°C
clear sky
Humidity 17 %
Pressure 1015 mb
Wind 9 Km/h
Wind Gust Wind Gust: 10 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 10 km
Sunrise Sunrise: 7:00 am
Sunset Sunset: 6:28 pm

Our Visitor

5 3 1 4 6 9
Total Users : 531469
Total views : 553854