![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
गोंदेगाव:- 17 सप्टेंबर हा वाहन चालक दिवस म्हणून साजरा केला जातो. जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हळनोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रविणभाऊ वाघ यांच्या संकल्पनेनुसार देशातील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता येणाऱ्या भावी पिढीला वाहतुकिचे नियम माहीत व्हावे. म्हणून गोंदेगाव तालुका सोयगाव येथील श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगून वाहन चालक दिवस साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस प्रशासनातर्फे श्रीकांत तळेगावे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .योगेश दादा इंगळे साहेब यांनी वाहन चालक तर्फे पहिल्यांदाच विद्यार्थांना वाहतूकीच्या नियमांचे चे धडे दिले जात आहेत व जय संघर्ष ग्रुप ची संकल्पना पाहुन डॉ इंगळे यांनी असाच उपक्रम विविध शाळेत घ्या, अशी मागणी केली,जय संघर्ष ग्रुप अध्यक्ष श्री संजय हळनोर सर यांचे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रविणभाऊ वाघ यांचे जय संघर्ष ग्रुप सर्व वाहन चालक व सदस्य पदाधिकारी कौतुक केले .व गोंदेगाव केंद्र प्रमुख श्री सचिन पाटील सर,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की ,,अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यामुळे काय नुकसान होते व अपघात झाल्यावर काय शिक्षा होते हे कायदेशिर काय शिक्षा होते हे समजून सांगितले .व जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रविणभाऊ वाघ यांनी विद्यार्थ्यांना देशात किती प्रकारची वाहतूक केली जाते. व रस्त्यावर चालत असताना अपघात होणार नाहीत यासाठी विविध नियमांची माहिती सांगितली. व जय संघर्ष ग्रुप चे कार्य कसे चालते व वाहन चालकांना रस्त्यावर चालतांना आलेल्या अडचणी कशा दूर करतो याची सविस्तर माहिती दिली. व शाळेचे मुख्याध्यापक श्री आर,एस,माळी सर,यांनी सांगितले की आमच्या एवढ्या मोठ्या एस. बी .हायस्कूल मध्ये हा कार्यक्रम घेतला आमच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगितले व मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद .,व शालेय समितीचे सदस्य व वनशा इन्फोटेक चे संचालक श्री शरद निकम सर, शालेय समितीचे सदस्य श्री आबाराव चौधरी,उपमुख्याध्यापक जी.जी. ढाकणे सर पर्यवेक्षक आर. एस. तायडे सर बी. ई .महालपुरे सर यांचे सहकार्य लाभले . आणि श्री स.भु.उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक श्री एस.जी. पोंदे सर, यांनी अतिशय ओघवत्या शैलीत विविध उदाहरणे देऊन जय संघर्ष समितीचे कार्य तसेच प्रवाशांना , तसेच वाहनचालकांना विविध ठिकाणी येणारे अनुभव त्याचप्रमाणे समस्या आणि या समस्या सोडविण्यासाठी आमचा जय संघर्ष ग्रुप कशा पद्धतीने कार्य करतो याबाबत खूप छान पद्धतीने उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला खूपच रंगत आल्याचे सर्व वाहन चालक मित्रांनी सांगितलं व कौतुक केले . गजभिये यांचेही छायांकन साठी मोलाचे सहकार्य लाभले असे प्रविनभाऊ म्हणाले. सदर कार्यक्रमास जय संघर्ष ग्रुपचे गोंदेगाव परिसरातील पदाधिकारी रहेमान तांबोळी,श्री मल्लुसिंग राठोड,शेख शाकीर,श्री भालचंद्र मासरे, आनंद माळी,श्री सुदाम चव्हाण, श्री मयूर पाटील,सेख निसार,श्री हनुमान अहिरे,श्री संजय राजपूत, श्री दिनकर साठे,श्री भावडु कोळी,संजय पाटील,दादाभु चव्हाण,भैय्या निकम, लक्ष्मुन चव्हाण,श्री गोटु पाटील,श्री संजय फरकांडे,श्री गजानन पाटील,श्री बाबुराव पाटील,श्री आधार देशमुख,चंदन पवार,तसेच शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी श्री मनोजभाऊ देशमुख,अतुलभाऊ वखरे यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना संस्था असे नेहमी सामाजिक कार्य करत असते .व जय संघर्ष ग्रुपचे सामाजिक कार्य पाहून आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था संघटनांनी जय संघर्ष ग्रुपला अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.आमच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आमचे गुरुवर्य श्री स.भु. उच्च माध्यमिक विद्यालयाचे भाषा विभागाचे प्रमुख प्राध्यापक श्री एस.जी. पोंदे सर यांनी केले.