



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा दि. 18: जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज घेतली.या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्यासह अशासकीय सदस्य स्वप्नील थानथराटे,धनंजय मुलकलवार ,नितीन काकडे,प्रेमराज मोहोकर, जयंत सब्जीवाले, संजय आयलवार,रवींद्र तायडे,चंद्रशेखर साठे,अनिल शेंडे,कृष्णा खेडीकर,विजय जाधव,डॉ.जयश्री सातोकर,प्रा.डॉ.अनिता महाजन, डॉ.नितीन तुरस्कर,हर्षल वंजारी,नितीन सेलोकर,मो.इकबाल अब्दुल रशीद सिददीकी,अभिजीत वंजारी, हेमंत साकुरे हे उपस्थित होते.
या बैठकीत ग्राहक हिताच्या दृष्ट्रीने आवश्यक मुददयांवर चर्चा झाली.तसेच या सोबत नियमीतरित्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका नियमीत आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.यावेळी अशासकीय सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.