![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राबविलेले अभियान मेरी माटी मेरा देश अंतर्गत आपल्या मातीला नमन व शहीद वीरांना वंदन करत प्रत्येक घरामधून माटी संकलन समारोह घेण्यात येत आहे. त्याला समर्थन देत आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्रात या कार्यक्रमाची सुरुवात करत अमृत कलश यात्रा काढून प्रत्येक गावामध्ये जाऊन कलश मध्ये माटी संकलन व पंचप्रण प्रतिज्ञा समारोह करण्यात आले. या कार्यक्रमाचा दूसरा दिवस असुन मौजा एकोडी पासुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. विजयभाऊ रहांगडाले प्रत्येक गावी जाऊन माटी संकलन व पंचप्रण प्रतिज्ञा समारोह घेतले व अभियानाचे महत्व सांगीतले की सर्व गावामधिल माटीचे दिल्लीला संकलन होइल व त्या मातीने विराच्या नावाने अशोकवाटिका निर्माण करण्यात येईल. त्यांना ग्रामस्थ व युवा वर्गाचा मोठ्या संख्येने प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. एकोडी, धामनेवाडा, दांडेगांव, सहेसपुर, गंगाझरी, मजितपुर, किंडंगीपार, पारडीबांध, डोंगरगांव, ओझीटोला, फत्तेपुर, मुंडीपार, सेजगांव खुर्द, भानपुर, खातीटोला, खळबंदा, कारुटोला, दवनिवाडा, वळद, बिजईटोला, देऊटोला, व पिपरटोला या गावामध्ये अभियान पार पडले. या प्रसंगी श्री भाऊराव कठाने, श्री ओम कटरे, श्री स्वानंद पारधी, श्री जिंतेंद्र (पिंटू) रहांगडाले, श्री चत्रभुज बिसेन, श्री पवन पटले, श्री रजनी कुंभरे, श्री हूपराज जमईवार, श्री मदन पटले, सौ. माधुरी रहांगडाले, सौ तुमेश्वरी बघेले, श्री बाला वाहिले व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते