![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर: तालुक्यात महिला शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर येथे दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी IQAC व Seminar/Conference/Workshop Committee द्वारे “करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी द युनिक अकॅडमी, नागपूर शाखा येथील प्रा प्रशिल कोडापे व श्री संदीप वाघमारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर कल्पना शिंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून, तर डॉ नीता सोमनाथ हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये उद्घाटक म्हणून लाभलेले प्रा प्रशिल कोडापे यांनी ग्रॅज्युएशन करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद करून त्यांचे अभ्यासविषय या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचे माध्यम ठरू शकतात, असे सांगितले. तसेच कोडापे सरांनी ड वर्गापासून अ वर्गापर्यंत आणि तलाठी पासून एमपीएससी/यूपीएससी पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर व परीक्षा पद्धतींवर क्रमाक्रमाने प्रकाश टाकला आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा धाडस व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री संदीप वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक असे भाषण करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अध्यक्षीय स्थानावरून डॉ नीता सोमनाथ यांनी बीए करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांकडे लक्ष देऊन अभ्यास करावा म्हणजे स्पर्धा परीक्षेतही या ज्ञानाचा उपयोग होईल, असे विशद केले आणि कार्यशाळेस उपस्थिती दर्शविलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
सदर एक दिवसीय कार्यशाळेचे संचालन प्रा विकास मेश्राम सरांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा मंगेश वागदे यांनी पार पाडले. कार्यशाळेला यश प्राप्त करून देण्यासाठी अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तर महाविद्यालयातील डॉ मुबारक कुरेशी, डॉ अरुणा देवगडे, डॉ उमेश चव्हाण, प्रा अशोक चोपकर, प्रा अंकिता झंजाड व मालु पेशने या सर्वांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात सहकार्य नोंदविले.
2 thoughts on “करियर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न”
Such a great information provided sir….Thank you sir
THANKS
YOUR FEEDBACK