



भंडारा जिला प्रतिनिधि/ मुनीश्वर मलेवार
भंडारा: शहरी ग्रामीण भागात ठिक ठिकाणी शासनाच्या अनेक कार्यालय आहेत स्थानिक पातळीवर नेमून दिलेल्या शासकीय कर्मचारी कर्तव्यावर वेळीच हजर राहत नाही त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणी येत असून कार्यालयीन काम करण्यास चकरा माराव्या लागत असतात काही शासकिय कार्यालयात कर्मचारीचा सुद्धा उपस्तीतीचा अभाव असल्यामुळे सामन्य नागरिकांना आपल्या हक्काच काम करण्यासाठी शासकिय कार्यालय प्रतीक्षा करावी लागत असते शासकीय कर्मचारी आणि अधिकारी कर्तव्याचया असलेल्या ठिकाणी राहत नसल्याने ठराविक वेळी कर्मचारी कार्यालयात हजर होत नसल्याने नागरिकांचे काम विलंबाने होत असतात बहुतांश शासनाचे कर्मचारी आपापल्या सोयी गरजेनुसार कर्तव्याचा ठिकाणी बाहेरून ये जा करीत असतात परंतू तेही आपल्या ठरेल्लेल वेळेनुसार नाही नेमलेल्या शहर आणि ग्रामीण क्षेत्रात कर्तव्य बजवणरे कर्मचारी अधिकारी यांना कर्तव्य करीत असलेल्या ठिकाणी वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने शासनाने नियम धब्यावर रखडलेले असतात कर्मचारी वर्गाला वेळेची शिस्त न लागल्याने शासकिय कामात सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येत असतात शासकीय कामात नागरिकांच्या अनेक कामे व अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या कर्मचारी नियुक्त असते कर्तव्याच्या ठिकाणी बहुतांश कर्मचारी राहत नसल्याचे बाहेरून कर्तव्याच्या ठिकाणी ये जा करीत असतात त्यामुळे आपले कर्तव्य बाजवत असेलेले कर्मचारी कामाच्या ठिकाणी वेळ कमी घालवत घाईघाईने परत निघून जात असतात अश्या वेळी स्थानिक सामन्य नागरिकांना येणाऱ्या कामाच्या अडीअडचणी कर्मचारी सोडवू शकत नाही त्यामुळे सामन्य नागरिकांच्या कामे प्रलंबित आणि अडचणी असतात कर्तव्यावर असणारी बहुतांश शासकीय कर्मचारी हे बाहेरून ये जा करीत असल्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, बँकेचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,यांच्या मुळे नागरिकांना अडचणी सहन कराव्या लागतात गावातील नागरिकांना वेळोवेळी येणारी अडचणी त्यामुळे ते कसे दूर होऊ शकतील असे प्रश्न गावकऱ्यांना नेहमी उपस्थित होतात निर्माण झाली आहे अश्यात कर्तव्य बजावणारा कर्मचारी हा सुद्धा गावात वेळोवेळी उपस्तीत राहायला पाहिजे पण बहुतांश कर्तव्य ठिकाणी असे चित्र पाहण्यास मिळत नाही शहरी ग्रामीण स्तरावरील नागरिक दरदिवशी कार्यालयात चकरा मारताना दिसतात शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना वेळ नियमांचे निर्बंध लावावे अशी सामन्य नागरिकांना अपेक्षा असून शासनाने कार्यालयीन कामकाज आणि कर्मचारी यांना वेळेची शिस्त नियमितपणे काम करण्याचे नियम लावून दिले पाहिजे!