![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तिरोडा- आझादी का अमृत महोत्सव निमित्त मेरी माटी मेरा देश तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आले असून प्रत्येक गावी जाऊन विजय रहांगडाले यांनी शौर्याचे प्रतीक स्तंभ व अमृतवाटिका निर्माण करण्याकरिता अमृत कलश यात्रा काढून गावागावातील माती संकलन केली. १६ सप्टेंबर २०२३ ला कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली व शेवटच्या दिवशी २५ सप्टेंबर २०२३ ला तिरोडा शहरांत भव्य कलश यात्रा घेण्यात आली. शहीद स्मारक पासून आरंभ भव्य कलश यात्रा शहराचे भ्रमण करत रेल्वे स्टेशन वर समापन करण्यात आली. तिरोडा गोरेगांव विधानसभा आमदार विजय रहांगडाले यांना यात्रेमध्ये शहरातील कार्यकर्ते, पदाधिकरी व नागरिकांचे साथ मिळाले. शाळकरी विध्यार्थी यात्रेमध्ये सहभागी झाले. शेवटी रेल्वे स्टेशन तिरोडा येथे विजय रहांगडाले व त्याच्या सोबत असलेले विध्यार्थी व नागरिक यांनी पंचप्रण प्रतिज्ञा वाचन करण्यात येत असून याद्वारे ज्ञात व अज्ञात हुतात्म्याचे स्मरण केले गेले. संकलित मातीचे कलश व सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आमदार विजय रहांगडाले मुंबई ला रवाना झाले.या अमृत कलश यात्रेमध्ये प्रामुख्याने जि. प. अध्यक्ष गोंदिया पंकज रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले,यात्रा संयोजक मदन पटले, जी.प.सदस्य श्री चत्रभूज बिसेन,पवन पटले, एड.माधुरी रहांगडाले, तुमेश्वरी बघेले,रजनी सोयाम, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, उपसभापती भूमेश्वर रहांगडाले प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, माजी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, सारंग मानकर, श्वेता मानकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,भाजयुमो तालुकाध्यक्ष रविंद्र वहिले, प.स.सदस्य ज्योती शरणागत, प्रमिला भलाई, तेजराम चव्हाण, ज्योती टेंभेकर, चेतलाल भगत,कविता सोनेवाने,सुनंदा पटले, शहर महामंत्री दिगंबर ढोक, प्रकाश सोनकावडे, नितीन पराते, संजय पारधी, राणी बालकोटे, राणी सोनेवाने उपस्थित होते.