![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ठाकचंद मुंगूसमारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भंडारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत महेबूब भाई शेख प्रदेशाध्यक्ष रा.यु.का बबन गीते ,मा.आमदार यवतमाळ ,प्रदिप नाईक मा. आमदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. ठाकचंद मुंगूसमारे यांनी या अगोदर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद भूषवलेले असून त्यांच्यावर आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलीआहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणार असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे असे निवडीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकचंद मुंगूसमारे यांनी सांगितले. दरम्यान, ठाकचंद मुंगूसमारे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक युवकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले.