![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
लातूर : लातूरच नव्हे तर देशभर गाजलेल्या महिला काँग्रेस पदाधिकारी हत्याकांडाचा आज निकाल लागला .साडेनऊ वर्ष चाललेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी हत्याप्रकरणाचा निकालात दोन मुख्य आरोपींना जन्मठेप तर चार जणांना तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावणी आहे.
साडेनऊ वर्षे चाललेल्या या प्रकरणात 1000 पानापेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल आहेत . 126 साक्षीदार तपासण्यात आले नंतर आज कोर्टाने यातील मुख्य आरोपी महेंद्रसिंग चौहान, व त्याचा मित्र समीर किल्लारीकर या दोघांना जन्मठेप तर विक्रमसिंह चौहान, कुलदीप ठाकूर, सुवरणसिंग ठाकूर आणि प्रभाकर शेट्टी यांना कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवून या चार जणांना तीन वर्षे सक्त कारावासाची शिक्षा आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर बी रोटे यांनी सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यातील 3 वर्षे कारावासाची शिक्षा झालेले आरोपी विक्रमसिंह चौहान हे माजी नगराध्यक्ष होते, व जन्मठेपेची शिक्षा झालेला मुख्य आरोपी महेंद्रसिंग चौहान हा त्यांचा मुलगा आहे. म्हणून हाय प्रोफाइल केसमुळे हे प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते, याच सुमारास लोकसभेची निवडणूक लागलेली होती, तर चंद्रपूरच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा उल्लेख जाहीर सभेत केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा देशभर झाली होती.
दि 21 मार्च 2014 रोजी युवक काँग्रेसची कार्यकर्ती ची कट रचून खून केल्याप्रकरणी येथील एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये विक्रमसिंह ठाकूर, महेंद्रसिंग चौहान, समीर किल्लारीकर , कुलदीप ठाकूर, सुवर्णसिंग ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजले होते. युवक काँग्रेसच्या या युवतीचा 21 मार्च 2014 रोजी कट रचून खून केल्यानंतर 27 मार्च 2014 रोजी तुळजापूर जवळील तलावात या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात सुरुवातीस एम आय डी सी पोलीस व नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात आला यानंतर सी आय डी व 2016 ला हे प्रकरण सी बी आय कडे सोपवण्यात आले होते.