उदगीर तालुका प्रतिनिधी/ चंचल हुगे
उदगीर:- संभाजी ब्रिगेड पक्ष संघटक करण्यासाठी आज दिनांक 15 /10 /2023 रोजी निडेबन ता. उदगीर, जि. लातूर येथे भव्य शाखा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला, कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली या सोहळ्यास उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार पुस्तक देऊन करण्यात आला. व तसेच शिवश्री मनोज पाटील यांना संभाजी ब्रिगेड, उदगीर शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली . शाखा उद्घाटनासाठी जिल्हाध्यक्ष : शिवश्री जितेंद्र मादलापूरकर, जिल्हासचिव : शिवश्री बाबासाहेब एकुर्केकर, तालुकाध्यक्ष : शिवश्री राजकुमार भालेराव, महिला आघाडी जिल्हा सचिव: शिवमती चंचलाताई हुगे, महिला आघाडी शहराध्यक्ष : शिवमती विमलताई मदने, जिल्हा उपाध्यक्ष : शिवश्री देवा घंटे, जिल्हा कार्याध्यक्ष : शिवश्री राजकुमार माने, जिल्हा संघटक: शिवश्री खाजाभाई शेख, ता. उपाध्यक्ष: शिवश्री बालाजी कसबे,शाखाध्यक्ष : शिवश्री धम्मसागर नरसिंग सोमवंशी, शाखा उपाध्यक्ष : शिवश्री भागवत चौधरी, सचिव : शिवश्री गंगाधर सोनकांबळे, सहसचिव : शिवश्री प्रकाश म्हेत्रे, कोषाध्यक्ष : शिवश्री शिवकांत गायकवाड, सल्लागार : शिवश्री गौतम कांबळे, कार्याध्यक्ष : विक्रम सोमवंशी, संघटक : बादल सोमवंशी. सदस्य : महेश कांबळे, विकास म्हेत्रे, प्रशांत सोमवंशी, अजित कांबळे, आकाश अनंतवाळ, वैभव गंधकवाड, प्रवीण चौधरी, ओमकार पाष्मे, आनंद सोमवंशी,अभिषेक सोमवंशी, प्रमोद गायकवाड, महेश कांबळे, सोनू कांबळे, राहुल सोमवंशी, गोपीनाथ सोमवंशी, गोविंद रुपनर आदी संभाजी ब्रगेडचे मावळे उपस्थित होते.