



भंडारा ;- सरकारी नोकर भरती कंत्राटी खाजगी पध्दतीने करण्यावर ओबीसी क्रांती मोर्चाने सातत्याने धरणे आंदोलन निदर्शने निषेध करत आवाज उठवला होता सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार बहुजन तरुण वर्गात या बाबत तीव्र संताप होता ओबीसी क्रांती मोर्चाने ओबीसी बहुजन तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे मागे उभे राहत भाजप शिंदे सरकारला उघडे पाडले ओबीसी बहुजन वर्गाची नाराजी ही तिव्र होत जातं होती येणाऱ्या 2024 निवडणूकी मध्ये दारुण पराभव होऊ शकतो तर ओबीसी बहुजन वर्ग आपल्या पासून दुरावत आहे हे लक्षात घेता शिंदे भाजप प्रणित सरकारने खाजगी करणाचा जीआर रद्द करण्याची नाच्चकी आली यासाठी ओबीसी क्रांती मोर्चा आणि ओबीसी बहुजन तरुणांनी सरकारला भाग पाडले.
दरम्यान कंत्राटी नोकर भरतीचा जीआर हा महाविकास आघाडी सरकार मधला आहे असे भाजप सरकार म्हणत आहे आणि आता काँग्रेस म्हणतो की भाजप सरकार मधला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर खापर फोडून ओबीसी तरुण पिढी व जनतेची दिशाभूल करीत असून येणाऱ्या 2024 च्या निवडणूकी मध्ये ओबीसी बहुजन समाज राजकीय नेत्यांना जागा दाखवेल हे मात्र निश्चित आहे.