![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा-आधार भूत धान खरेदी संदर्भात हंगाम 2022-23पासून अटी व शर्तीमंध्ये वाढ करण्यात आलेली असून यावर्षी पासून 1.00कोटी बँक गॅरंटी तसेच 20.00 लक्ष रुपये FDR देण्याचे निर्देशीत होते सदर अटी धान खरेदी संघाला मान्य नसल्याने अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांचे सात बारे ऑनलाईन न करण्याचे खरेदि केंद्राने ठरविले होते यावर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल सदर अटी शिथिल करण्याची मागणी केली असता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विदर्भातील आमदार व मंत्री याचेसोबत पणन विभागाचे विभाग प्रमुख यांचे सोबत आज बैठक बोलाविली यामध्ये प्रामुख्याने 1.00 कोटी रुपये बँक गॅरंटीची अट शिथिल करून 20.00 लक्ष ऐवजी 10.00 लक्ष FDR कायम ठेवण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले तसेच खरेदी केलेल्या धानाची उचल 15 ते 20 दिवसात करणे, जेवढे दिवस धान गोडाऊन मध्ये साठवून राहील तेवढ्या दिवसाचे भाडे देण्यात यावे,31.00 रुपये कमिशन देण्यात यावी आदी निर्देश मंत्री महोदयांतर्फे देण्यात आले असून येत्या दोन दिवसात शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले या बैठकीला प्रामुख्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार आशिष जैस्वाल, विनोद अग्रवाल,कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, राजू कारेमोरे,मा.विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके, मा.खासदार शिशुपाल पटले, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसचिव सतीश सुपे व विदर्भातील जिल्हा पणन अधिकारी व संबंधित विभाग प्रमुख उपस्थितीत होते.