![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवर घाटकुरोडा रेती घाट असल्याने या घाटावर जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मागील ३ वर्षापासून हा रस्ता मजबुतीकरन करण्याबाबत मागणी सालेबर्डी मांडवी घाटकुरोडा येथील नागरिकांची होती यावर तोडगा काढत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सदर रस्त्यांकरीता ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली असता तातडीने मंत्री महोदयांकडून तिरोडा सालेबर्डी मांडवी घोगरा घाटकुरोडा या एकूण १०.८४ कि.मी.रस्त्याकरिता २४७४.१६ लक्ष ५ वर्षे देखभाल व दुरुस्तीकरिता १५९.६३ लक्ष असे एकूण २९३३.७९ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले यामुळे सालेबर्डी,मांडवी घोगरा, घाटकुरोडा वासीयांची रस्त्याची समस्या दूर झालेली असून मागणी पूर्ण केल्याने ग्रामवासियांनी आमदार महोदयांचे आभार मानले आहेत