![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तिरोडा/ 18 व्या इंडियन स्पोर्ट एरोबिक फिटनेस फेडरेशन (ISAFF) द्वारे मंड्या (कर्नाटका) येथे आयोजित राष्ट्रीय एरोबिक अँड हीपहोप स्पर्धा 2023 मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करतांना तिरोडा शहरांतून गेलेल्या टीम ने 6 ग्रूप मध्ये भाग घेतला त्यातून 5 मध्ये गोल्ड आणि 1 मध्ये ब्राँझ मेडल पटकावित उतुंग यश संपादन केले. यात खालील प्रकारे ग्रूप मध्ये मेडल संपादन केले. 1) फिटनेस एरोबिक अंडर 9 पिटाय मध्ये गोल्ड ???? मेडल यात याज्ञनी धूर्वे, ओजस पराते, अनवी भंडारकर, हिर ग्यनचंनदानी, गरिमा झरारीया, 2) स्पोर्ट एरोबिक फिटनेस अंडर 9 मध्ये गोल्ड ???? मेडल यात वैभवी केशरवणी, निराली चापले, अनया गाहेरवार, उन्नती ठाकूर, आनंदी बांते, विदिशा पागोडे, श्रेयांश रोडगे, गोकुळ घरजारे 3) स्पोर्ट एरोबिक ट्रायो मध्ये गोल्ड ???? मेडल यात गोकुळ घरजारे, वैभवी केशरवाणी, श्रेयांश रोडगे 4) स्पोर्ट एरोबिक सोलो मध्ये ???? गोल्ड मेडल यात श्रेयांश रोडगे 5) फिटनेस एरोबिक मास्टर ग्रुप मध्ये गोल्ड ???? मेडल यात डॉ.अमोल धुर्वे, डॉ.सोनिया धुर्वे, निखिल शेंडे, अक्षय शेरकर, युक्ती तिडके 6) फिटनेस एरोबिक अंडर 17 पिटाय मध्ये ब्राँझ ???? मेडल यात हर्षिता नारनवरे, केशर बुराडे, खुशप्रित ठाकूर, जानवी असाटी यांनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे एशियाई देशाच्या डिसेंबर महिन्यात नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघातून खेळण्याचा मान मिळविला. पदक तलिका मध्ये महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्याने संपुर्ण देशात दुसरा क्रमांक पटकाविला. यशाचे श्रेय मुलांनी प्रशिक्षक श्री. दिपक घरजारे, श्री.निखिल शेंडे, कु.युक्ती तिडके, यांच्या अथक परिश्रमाला दिले. यशाबद्दल तिरोडा गोरेगांव विधानसभेचे आमदार श्री.विजयभाऊ रहांगडाले, माझी बांधकाम सभापती श्री.अशोकजी असाटी, श्री.अजयजी गौर (माजी न. प. सदस्य तिरोडा) श्री.राजेशजी गुनेरिया (माजी न. प. सदस्य तिरोडा), श्री.मुकेशजी अग्रवाल (संचालक , मेरीटोरियस पब्लीक स्कूल तिरोडा) सौ.अंजली झारारिया (अध्यक्ष प्रिती समाजीक शिक्षण संस्था तिरोडा), सौ.प्रिती झारारीया (सचिव प्रिती समाजीक शिक्षण संस्था तिरोडा), श्री.विकासजी बारापात्रे (प्रिन्सिपल, शहीद मिश्रा शाळा, तिरोडा),श्री. रोहीत तिरपुडे (प्रिन्सिपल, लिटिल फ्लॉवर अकॅडमी, तिरोडा), सौ.राजलक्ष्मी तुरकर (प्रिन्सिपल, गिरजाबाई कन्या स्कूल, तिरोडा), सौ. वर्षा सोनी (प्रिन्सिपल, असीम सराफ स्कूल, तिरोडा), सौ. रतना खन्ना (प्रिन्सिपल, स्टार इंटरनॅशनल स्कूल, गोंदिया) , श्री. तुषार येरपुडे (प्रिन्सिपल, मेरीटोरियस पब्लीक स्कूल तिरोडा), श्री.सुनील शेंडे (अध्यक्ष, गोंदिया जिल्हा स्पोर्ट एरोबिक आणि फिटनेस असोसियेशन), श्री.दिपक घरजारे (सचिव गोंदिया जिल्हा स्पोर्ट एरोबिक आणि फिटनेस असोसियेशन), समीर पटेल, उमेश मलेवार, सचिन हिरापुरे, सचिन कुंभारे, हर्ष मिश्रा, आणि तिरोडा तालुका क्रिडा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली करीता शुभेच्छा..