![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया: प्रकाशपर्व गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक रेलटोली येथील गुरुद्वारा येथे शीख बांधवांतर्फे गुरू गोविंदसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी हजेरी लावून समाज बांधवांसोबत गुरुनानक देवजी यांची पूजा करून आशीर्वाद प्राप्त केला. यावेळी शहर भाजपा अध्यक्ष अमित झा, सतनाम रामानी, मंगलसिंग होरा, अशोक चौधरी, अजित गांधी, रेल्वे कमिटीचे सदस्य जसपाल सिंग चावला, बिन्नी गुलाटी, हरभजन सिंग होरा, सिनू होरा, बलजीत सिंग बग्गा, आकाश बग्गागुरू गोंविंदसिह यांना अभिवादन करताना गोपालदास अग्रवालयां च्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.