तुमसर : श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९९ वा जयंती महोत्सव संताजी स्नेही समाज मंडळाच्या वतीने शुक्रवारला मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. दिवसभरात विविध कार्यक्रमांनी नियोजित जयंती महोत्सव सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेने तुमसर शहर दुमदुमुन उठले. सकाळचे सुंदर कांड आणि संताजी जगनाडे महाराजांची महाआरती निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडली. माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक मंडळ तथा महिला मंडळाच्या प्रमुख उपस्थित पुजन व महाआरती करण्यात आली. त्या दरम्यान नवयुवकांच्या नेतृत्वात शहरभरातून बाईक रेलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान संताजींचा उद्घोष करत सायंकाळी शहरातून निघालेली शोभायात्रा जयंती महोत्सवाच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.
जयंती दिनी विविध कार्यक्रम पार पाडून सायंकाळी शहरात संताजी महाराज यांची भव्य शोभायात्रा संताजी सभागृहातुन काढण्यात आली होती. शोभायात्रेत महिलांनी लोकनृत्य सदर कले.
शोभायात्रा संताजी भवनातून दत्त मंदिर मार्गे मोठा बाजार तर पुढे जैन मंदिर ते बावनकर चौकातून जुन्या बस स्थानकहून पुढे दुर्गा मंदिर परिसरातून शोभायात्रा परत निघाली. दरम्यान समापन कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रदिप पडोळे, मंडळाचे सर्व संचालक मंडळ तथा तैलिक समाजाच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ तथा जुन्या संचालक मंडळ तथा युवक युवतींनी अथक प्रयत्न केले.