



भंडारा प्रतिनिधि/ भंडारा आणि लाखनी तालुक्यातील एकूण 24 गावातील 3390 हेक्टर भूमीला लाभ मिळेल अश्या धारगाव उपसा सिंचन योजनेच्या भाग एक ला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवीत मंजूरी प्रदान केली असून या करीत लागणार 350 कोटींचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. या सिंचन योजने करीत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी गेल्या काही महिन्यां पासून तगादा लावला होता ज्याचे फलित म्हणून या योजनेला आज मुख्य मंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली आहे.
भंडाऱ्यातील महत्वाचे प्रकल्प म्हणजे पागोरा, करचखेडा व टेकेपार उपसा सिंचन योजने च्या लाभा पासून भंडारा व लाखनी तालुक्यातील काही गावे वंचित राहिली होती. या गावांना लाभ पोहचावा म्हणून आम. भोंडेकर यांनी धारगाव उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी अशी मागणी शासना पुढे मांडून विदर्भ पाटबंधारे विभागास याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. ज्यात धारगाव उपसा सिंचन हे गोसे प्रकल्पाचे म्हणून घेण्यात अडचणी येत असल्याने याला स्वतंत्र मान्यता देवून ही योजना भंडारा तालुक्यातील उसरागोंदि गावा जवळील वैनगंगा नदिस मिळणाऱ्या नाल्यावर तयार करायची मागणी करण्यात आली. या मागणीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून याला भाग 1 आणि भाग 2 असे विभाजल्या गेले आहे. यातील भाग 1 ला आज मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली. या द्वारे भंडारा व लाखनी तालुक्यातील क्रमशः 18 व 6 असे एकूण 24 गावातिल 3390 हेक्टर क्षेत्रास लाभ मिळणार आहे. जय करीत लागणारे 350 कोटींचा निधी लवकरच प्राप्त होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आम. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली. ज्या नंतर या क्षेत्रातील शेतकाऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.