



भंडारा प्रतिनिधि/
राम नामाचे सामर्थ्य सर्वश्रुत आहे. 22 जानेवारीच्या विलक्षण अशा सोहळ्याची सर्वजण वाट पाहत असताना रामाचा संदेश घेऊन निघालेल्या खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्हा पालथा घातला. राम गावापर्यंत आले आणि गावकऱ्यांनीही रामरायाचे तेवढ्याच आनंदात आणि उत्साहात स्वागत केले.
आबाल वृद्ध सगळ्यांनी स्वतःला रामनामात न्हाऊन काढले. गाव राममय झाला. खेळाच्या मैदानात रामाचा जयघोष झाला. जणूकाही अयोध्या नगरी अवतरली. रामाचा संदेश घेऊन निघालेल्या खासदारांचे कौतुक आहे राम भक्तांच्या मुखी होते..
श्रीराम रथ यात्रा भंडारा-गोंदिया | सडक/अर्जुनी