



गोंदिया प्रतिनिधि/ गोंदिया जिल्ह्याची जीवनदायिनी, जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून वाहणारी, जवळपास 70 कि.मी. प्रवाहक्षेत्र असणारी, गोरेगांव , गोंदिया व अंशतः आमगांव तालुक्यातील एकमेव नैसर्गिक जलस्त्रोत असणारी, शेतकर्यांसाठी वरदान ठरणारी, शेकडो हेक्टर शेतजमीन सिंचीत करणारी, जिल्ह्यातील भुजल पातळीत भर (वाढ़) घालणारी , गोरेगांव येथील तेढा तलावातून उगम पावणारी व गोंदिया तालुक्यातील छिपीया (कामठा) येथे मध्यप्रदेश राज्याच्या सिमारेषेवर वाघ नदीत संगम होणार्या पांगोली नदीचे खोलीकरण, रूंदीकरणासाठी म्रदा व जलसंधारण विभागाकडून तैयार करण्यात आलेल्या रु.44.00 कोटीच्या डि.पी.आर. ला शासनाने तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा तसेच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या दि.25 जुलै 2023 रोजीच्या ज्या शासननिर्णयानुसार शहरी क्षेत्रालगतहुन वाहणाऱ्या अधिसूचित नद्यांची वहनक्षमता पुन:स्थापित , पुनर्जीवित करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे जे धोरण ठरविण्यात आलेले आहे , त्या अधिसूचित नद्यांच्या यादीत पांगोली नदीचा देखील समावेश करण्यात यावे , पांगोली नदीवर म्रदा व जलसंधारण विभागाकडून तसेच जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आलेल्या व आता जिर्ण झालेल्या कोल्हापुरी बंधार्यांची व अन्य स्वरूपाच्या बंधार्यांची दुरूस्ती करण्यात यावी, नदी प्रवाह क्षेत्रात आवश्यक ठिकाणी नवीन बंधारे बांधण्यात यावीत , नदीच्या दोन्ही काठांवर देशी प्रजातीच्या झाडांचे सामाजिक वनिकरण विभागाकडून शासकीय योजनेतून वनीकरण , व्रक्षारोपन करण्यात यावे तसेच पांगोली नदीच्या पात्रात प्रदुषित सांडपाणी सोडणारे नदी काठाशेजारी असणारे राईस मिल्स, लाख कारखाने , ईतर कारखान्यांवर शासनाने कार्यवाही करावी, छोटा गोंदिया येथील नदी पात्राशेजारील परिसरात सांडपाणी जल पुनर्वापर व व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावे , पांगोली व वाघ नदीचे संगम स्थळ छिपीया येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावे , नदीकाठालगत असणाऱ्या स्मशान घाट व धार्मिक स्थळांचा विकास करण्यात यावे तसेच छोटा गोंदिया-चुलोद मार्गावरील पांगोली नदीवर असणाऱ्या जुन्या अरूंद पुलाऐवजी रूंद व दोन्ही बाजूंकडून वाहने येऊ-जाऊ शकतील , या स्वरूपाचे रहदारी पुल बांधकाम तात्काळ शासनाकडून मंजूर करण्यात यावे.
श्री तिर्थराज ते . उके , संयोजक , पांगोली नदी वाचवा अभियान क्रती समिती , गोंदिया.