![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट तसेच प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ ते २५ जानेवारी २०२४ ला महाविद्यालयातील दिशा सभागृहात वार्षिक स्नेह संमेलन ब्रम्हांड २०२४ चे सांस्कृतिक विभागाकडून आयोजन करण्यात आलेले होते २४ जानेवारी २०२४ रोज बुधवारला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामटेकचे माजी आमदार मा.श्री.आनंदरावजी देशमुख उपस्थित होते तर उदघाटक म्हणून कवी कुलगुरू कालिदासचे अधिष्ठाता प्रो.मधुसूदन पेन्ना उपस्थित होते तर मुख्य उपस्थित म्हणून महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष रविकांत रागीट उपस्थित होते तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्रीताई देशमुख उपस्थित होत्या तसेच जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुंभारे, माजी नगरसेवक रामटेक विवेक तोतडे उपस्थित होते २५ जानेवारी २०२४ रोज गुरुवारला बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या जयश्रीताई देशमुख उपस्थित होत्या, प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की स्नेह संमेलन महाविद्यालयात का बरं घ्यावे तर त्यांनी आपले मत व्यक्त केले की विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास व्हावा व वर्षातून एक तरी दिवस विद्यार्थ्यांना आनंद व्यक्त करण्यासाठी देने महत्वाचे असते तसेच मुख्य अतिथी म्हणून माजी IAS सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी नागपूर मा.श्री किशोरजी गजभिये सर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना MPSC/UPSC परीक्षेचे मार्गदर्शन केले. विशेष उपस्थिती म्हणून नंदिवर्धन ज्युनिअर कॉलेज नगरधनचे प्राचार्य दीपक मोहोड सर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक घडामोडी बद्दल मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष रविकांत रागीट सर देखील उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी BACS च्या विभाग प्रमुख प्रा.चेतना उके बी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.शालू वानखेडे , NAAC समन्वयक प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, NAAC समन्वयक प्रा.किरण शेंद्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुलकर, प्रा.कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा.विलास मडावी, प्रा.आकाश मोहबिया, प्रा.अनिल मिरासे, प्रा.मयुरी टेम्भुरणे, प्रा.निकिता अंबादे, अतुल बुरडकर, सुरेश कारेमोरे,गीता समर्थ, निकिता फाये, राजेंद्र मोहनकर, संदीप ठाकरे इत्यादीनि परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थित मोठ्या संख्येने होती