![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- रामटेक तालुक्यातील नगरधन येथे सौ. नेहा विशाल बरबटे, श्री. विशालजी बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख उ.बा.ठा.) व समस्त मित्र परिवारांकडून हळदी-कुंकू कार्यक्रमाचेसौ. नेहा विशाल बरबटे व समस्त मित्रपरिवाराकडून हळदी-कुंकूचा कार्यक्रम संपन्न आयोजन करण्यात आले होते. अतिशय आनंदात व थाटात पार पडलेल्या या कार्यक्रमात नगरधन येथील महिलांनी उत्स्फुरतेने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सिमाताई बिरणवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. करुणाताई पौनीकर यांनी केले. दीपप्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमाला यशस्वी करण्यात ज्या ज्या महिला-भगिनींनी हातभार लावला त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार सौ. नेहाताई विशालजी बरबटे यांनी मानले व उपस्थित सर्व महिलांना वान देण्यात आले. यावेळी सौ. सिमाताई हारोडे, सौ. बबिताताई अनिल येळणे, सौ. रोशनीताई सरोदे (ग्रा.पं. सदस्या नगरधन), सौ. शारदाताई सरोदे (ग्रा.पं. सदस्या नगरधन), सौ. संगीता तरारे (ग्रा.पं. सदस्या नगरधन), सौ. संगीता नान्हे (ग्रा.पं. सदस्या नगरधन), सौ. शारदा ठाकरे (ग्रा.पं. सदस्या नगरधन), सौ. शकुंतला बावनकुळे, सौ. प्रियंका सव्वालाखे, सौ. वैशाली बावनकुळे, सौ. रुपाली पडोळे, सौ. नेहा साळवे, सौ. वैशाली कामडी, सौ. कांचन ईखार, सौ. आशा धोपटे व समस्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.