प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम निलागोंदी अंतर्गत सालईटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. शाळा प्रवेशद्वार बांधकाम आणि परिसर सौंदर्यीकरण साठी एकूण ७ लक्ष रुपये खर्च करण्यात आले असून या पूर्वी देखील शाळेच्या संरक्षक भिंती साठी २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम नृत्य सादर करुन आमदार विनोद अग्रवाल यांचे स्वागत केले. गावाच्या विकासासाठी शाळा महत्त्वाची असून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक असल्याचे मत यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. सोबतच शाळेतील रिक्त पदांवर स्वयंसेवक शिक्षक नियुक्त करा आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार नियोजन करा निधी ची पर्वा करू नका असे आश्वासन देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी शाळा व्यवस्थापनाला दिले.
दरम्यान सौ. सुशीलाताई जगदीश लील्हारे, जि प सदस्य विजयजी उईके, पं स. सदस्य हिरामणजी दहाट, माजी जिप सदस्य कृष्णकुमारजी जयस्वाल, विक्कीजी बघेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चुन्नीलालजी रहांगडाले, सुभाषजी शेंडे, माजी सरपंच दुलीचंदजी उईके, पोलीस पाटील दिनेशजी कळीनहाके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हंसारामजी ठाकरे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष गेंदलालजी ठाकरे, उपसरपंच नरेशजी धूर्वे, ग्राम पंचायत सचिव जी सी ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य रेखलालजी भलावी, भागेश बिजेवार, पुस्तकलाताई गजभिये, जागृतीताई हरीणखेडे, सत्यशिला मडावी, लक्ष्मीबाई उईके, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि गावकरी उपस्थित होते.