![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
साकोली/ प्रतिनिधि वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अंतर्गत करंजेकर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात भव्य दिव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. निमित्य आहे डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांच्या वाढदिवसाचे. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांचा 3 फेब्रुवारी हा वाढदिवस. याच प्रासंगिक दिनाचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात ४० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग दर्शविलेला आहे. सदर रोजगार मेळाव्यासाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर,पदवीधर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रता धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी http://www.kcemsakoli.in/या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता अथवा ८४८४८७०८४५ या हेल्पलाइनवर संपर्क करून करू शकता. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधार कार्डच्या छायांकित प्रति सोबत आणाव्यात. नीम शहरी तथा ग्रामीण भागातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात याव्या अशी डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांची प्रेरणा आहे. याकरिता त्यांनी विविध क्षेत्रातील महाविद्यालयाची दालणे विद्यार्थ्यांसाठी उघडी करून दिलीत. याचा फायदा देखील विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे दिसून येते. शिक्षणानंतर पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रोजगार महामेळाव्यामध्ये सहभागी होऊन लाभ घेण्याची आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी केले आहे.