![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार हे १६ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवसाच्या नागपूर भेटीवर येत आहेत.
श्री. मुनगंटीवार यांचे मुबंई येथून सकाळी ०७:१० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. त्यांच्या हस्ते दुपारी १२:०० ते ०३:०० वाजे दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्पालातंर्गत विविध उद्घाटने व शुभारंभ होणार आहेत. यानंतर सायंकाळी ०४:०० वाजता ते देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास ते भेट देणार आहेत. सायंकाळी ०५:००वाजता त्यांच्या उपस्थितीत नागपूर येथील वनभवनाच्या हरिसिंह सभागृहात मधाच्यागावाबाबत बैठक होणार आहे.
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या ५० व्या स्थापना दिनानिमित्त सायंकाळी ०७:०० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रात्री ११.२० वाजता श्री मुनगंटीवार हे नागपूर विमानतळाहून नवी दिल्लीकडे रवाना होतील.