![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- ट्रक – टिप्पर ची आमोरासमोर जोरदार धडक होवुन दोन्ही चालकांचा मृत्यु झाल्याची घटना दि. १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीला १ वाजताच्या सुमारास तुमसर मार्गावरील घोटीटोक गावाजवळ घडली.
रामटेक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17.02.2024 रोजी रात्री 01.00 वा. सुमारास यातील MH 32 Q 1092 चा चालक राजू कोंडू कुथे वय 40 वर्ष रा. खापा हा डोंगरी बुजुर्ग येथून मॅग्निज घेऊन तुमसर कडून रामटेक कडे येत होता. दरम्यान टीप्पर क्र MH 40 BF 3434 चा चालक रुपेश राजकुमार धूर्वे वय 22 वर्ष रा. करकोटी ता. कुराई जि. शिवणी हा त्याचा ताब्यातील टिप्पर मध्ये गिट्टी भरून तुमसर कडे जास्त असता त्याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून ट्रक क्र.MH 32 Q 1092 ला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर झाला. यात दोन्ही चालकांचा मृत्यु झाला आहे. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामटेक येथे अप क्रमांक 118/20240कलम 279,304(अ) भा. द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढिल तपास पो.उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के करीत आहे.